Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेश मिश्रा २८ तारखे नंतर दाखल करणार. उमेदवारी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजेश मिश्रा २८ तारखे नंतर दाखल करणार. उमेदवारी


काँग्रेस सतत पराभूत होणाऱ्या मतदार संघात सेना पहिल्यांदा मोठया फरकाने विजयी होईल



अकोला. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधना मुळे रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकी सोबत मतदान होत आहे. महा विकास आघाडी मध्ये काँग्रेस पक्षाला अकोला लोकसभा उमेदवारी मिळाली असल्याने अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा दावा असून यासाठी एक निष्ठावान कुटुंबं असलेल्या राजेश मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली असून या जागेवर काँग्रेस सतत पराभूत होत आहे आता या मतदार संघात सेना पहिल्यांदा मोठया फरकाने विजयी होईलअसा दावा शिवसेना आमदार तथा जिल्हाध्यक्ष नीतीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.


.५० ते ६० हजार मतांनी विजयी होणार
राजेश मिश्रा कुटुंबं शहरात भाजपने लावलेल्या हिंदू मुस्लिम दंगलीत हिंदू कुटुंबंना संरक्षण दिले आहे ्यासोबत जनतेच्या हिताचे महानगर पालिकेने स्वाती कंपनीला दिलेल्या कंत्राट बाबत पहिल्यांदा आवाज उठवला., स्वाती कंपनीच्या विरोधात पहिल्यांदा राजेश मिश्रा यांनी आवाज दिला. त्यामुळे मराठी आवाज विधानसभेत जाणार आहे. या जागेवर काँग्रेस सतत पराजित झालेली असल्याने काँग्रेसने या जागेवर दावा करू नये कारण वर लोकसभा कॉग्रेसला आणि खाली विधानसभा शिवसेनेला असल्याने छान मेळ बसला आहे. अकोला पश्चिम बिधानसभा पोट निवडणुकीत ही जागा शिवसेनेला देणे बंधनकारक आहे. भाजपने या मतदारसंघात केवळ भाजपा ने. दंगल घडवीण्याचे काम केले.विकास केलाच नाही त्यामुळे आता विकासासाठी जनता राजेश मिश्रा यांना ५० ते ६० हजार मतांनी विजयी करणार असल्याचा दावा त्यांनी आज केला. यावेळी शिवसेना जिल्हा कार्यकारिणी आणि महानगर कार्यकारिणी उपस्थित होती.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या