Ticker

6/recent/ticker-posts

लघुपत्रकारांनी स्वाभिमान जागृत ठेवूनच पत्रकारीता करावी.उमेद्वार आणि राजकिय पक्षांच्या बातम्यांची प्रसिद्धी टाळावी. -संजय कडोळे

लघुपत्रकारांनी स्वाभिमान जागृत ठेवूनच पत्रकारीता करावी.उमेद्वार आणि राजकिय पक्षांच्या बातम्यांची प्रसिद्धी टाळावी. -संजय कडोळे


 वाशिम : ग्रामिण भागातून दैनिकांची पत्रकारिता करणारे आणि साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक व वृत्तप्रतिनिधी हे "लघुपत्रकार" म्हणून ओळखले जात असतात.व खऱ्या अर्थाने ग्रामिण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आणि तळागाळातील जनता जनार्दनाच्या समस्यांना आपल्या लेखणीद्वारे हेच लघुपत्रकार वाचा फोडीत असतात.आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असून, भारतीय प्रजासत्ताक लोकशाही ही ग्रामिण भागामुळेच कणखरपणे टिकून आहे. संसदेत निवडून येणारे खासदार आणि विधानसभेत निवडून येणारे आमदार हे ग्रामिण भागातूनच मताधिक्य घेऊन विजयी होत असतात. आणि म्हणूनच सार्वत्रिक निवडणूकांमधील उमेद्वार आणि राजकीय पक्ष केवळ निवडणूकांपुरताच लघुपत्रकारांचा आपल्या राजकिय लाभाकरीता वापर करून घेत असतात.आणि एकदाची निवडणूक संपली रे संपली म्हणजे मग मात्र लघुपत्रकारांना हेतू पुरस्पर पणे टाळत असतात. त्यामुळे हे कटूसत्य लक्षात घेऊन प्रत्येक लघुपत्रकारांनी आजच सावध होणे गरजेचे आहे.मोठमोठ्या वृत्तपत्रांना फुल्ल पेजच्या लाखो रुपयांच्या जाहिराती देणारी ही मंत्री-खासदार-आमदार मंडळी आणि त्यांचे राजकीय पक्ष लघुपत्रकारांची सदैव उपेक्षाच करीत असतात.ग्रामिण लघुपत्रकारांच्या आणि लहान साप्ताहिकाच्या प्रसिद्धी मधून सर्वसामान्यातून निवडून गेल्यावर निवडणूक संपताच "गरज सरो वैद्य मरो." याप्रमाणे लघुपत्रकाराशी यांची वागणूक असते. निवडून आल्यावर त्यांच्या राजकीय कार्यक्रम,वाढदिवस, दसरा दिपावलीच्या जाहिराती सुद्धा द्यायला हे टाळाटाळ करीत असतात. त्यामुळे येणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत वृत्तांकन करणाऱ्या प्रत्येक लघुपत्रकार यांनी आजच सावध होऊन वृत्तांकन करावे.उमेद्वार व राजकिय पक्षांकडून जाहिराती घ्याव्यात.व जे उमेद्वार आणि राजकिय पक्ष जाहिराती देणारच नसतील अशा उमेद्वार आणि राजकीय पक्षाच्या बातम्यांना नि:शुल्क प्रसिद्धी न देता अशा राजकिय बातम्यावर सरळ सरळ बहिष्कार टाकावा.


 "निवडणूक काळात जाहिराती मागणे हा लघुपत्रकारांचा न्याय्य हक्क असतो व निवडणूक काळात आपल्या प्रचारप्रसाराकरीता शहरी प्रतिष्ठित वृत्तपत्रांना उमेद्वार व राजकिय पक्ष हे ज्याप्रमाणे जाहिराती देतात त्याचप्रमाणे ग्रामिण भागातील तसेच लघुसाप्ताहिकांनाही जाहिराती देणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. अन्यथा सर्व स्वाभिमानी लघुपत्रकार व साप्ताहिक वृत्तपत्र यांनी येत्या सार्वत्रिक निवडणूकीत उमेद्वार व राजकिय पक्षाच्या बातम्यांवर बहिष्कार टाकावा." असे जाहिर आवाहन महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी लघुपत्रकारांकरीता केले आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या