Ticker

6/recent/ticker-posts

‘मोदी की गॅरंटी’मुळे महाराष्ट्राच्या विकासाला वेग! शेतकरी सन्मान निधीतून महाराष्ट्रातील एक कोटी शेतकऱ्यांना ३० हजार कोटींचा लाभ

‘मोदी की गॅरंटी’मुळे महाराष्ट्राच्या विकासाला वेग! शेतकरी सन्मान निधीतून महाराष्ट्रातील
एक कोटी शेतकऱ्यांना ३० हजार कोटींचा लाभ


अकोला
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीतून आतापर्यंत देशातील ११ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये तीन लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यातील ३० हजार कोटी तर यवतमाळच्या शेतकऱ्यांना ९०० कोटी रुपये मिळाले आहेत. शेतकरी, महिला, युवक आणि गरिबांच्या सक्षमीकरणातूनच भारत हे विकसित राष्ट्र बनणार असून पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या साक्षीने यवतमाळमध्ये सोडलेल्या या संकल्पाचा आम्हाला अभिमान वाटतो, अशी भावना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील तेजराव थोरात जयंत मसने प्रभाकर मानकर बाळासाहेब आपोतीकर अशोक राठोड श्रीकृष्ण मोरखडे रावसाहेब कांबे , चंद्रशेखर पांडे गुरुजी, उमेश पवार मनीराम टाले, सुमन ताई गावंडे, बळीराम सिरस्कार वैशाली निकम कुसुम भगत संतोष शिवरकर सचिन देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.



काँग्रेसच्या सरकारांनी अनेक दशकांपासून देशात रखडवत ठेवलेल्या सुमारे १०० मोठ्या सिंचन योजनांपैकी ६० पेक्षा अधिक योजना मोदी सरकारने पूर्ण केल्या असून महाराष्ट्रातील रखडलेल्या २६ योजनांचाही त्यामध्ये समावेश असल्याने महाराष्ट्र जलसंपन्न होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मोदी सरकारने उसाच्या किफायतशीर मूल्यात (एफआरपी ) विक्रमी वाढ केली आहे. आता उसाचे किफायतशीर मूल्य क्विंटलमागे ३४० रुपये झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना याचा लाभ मिळणार आहे.
भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी गरीब, शेतकरी, युवा आणि नारीशक्ती हे मोदी सरकारच्या प्राधान्यक्रमांचे घटक आहेत. हे चार घटक सक्षम झाले की प्रत्येक समाज, प्रत्येक घटक, देशातील प्रत्येक कुटुंब सक्षम होईल. आतापर्यंत देशात एक कोटी भगिनी लखपती दीदी बनलेल्या आहेत. या भगिनींना बँकांमधून आठ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात महिलांच्या बचत गटांना आठशे कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील अनेक भगिनींना ई रिक्षादेखील देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील एक कोटी कुटुंबांना आयुष्यमान कार्ड देण्याचे अभियान सुरू झालेले आहे. कोट्यवधी गरिबांसाठी पक्की घरे बनली असून ओबीसी कुटुंबांसाठी घरे निर्माण करण्याच्या विशेष योजनेतून दहा लाख ओबीसी कुटुंबांना पक्की घरे मिळणार आहेत, असे अकोला जिल्हा भाजपाने म्हटले आहे आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात आदिवासी समाज नेहमीच उपेक्षित राहिला. मोदी सरकारने आदिवासी समाजातील सर्वात मागास प्रवर्गापर्यंत लाभाच्या योजना पोहोचविल्या असून प्रथमच त्यांच्या विकासासाठी २३ हजार कोटी रुपयांची पंतप्रधान जनमन योजना सुरू झालेली आहे. ही योजना महाराष्ट्रातील कातकरी, कोलाम आणि माडिया सारख्या अनेक आदिवासी समुदायांना चांगले जीवनमान प्रदान करेल, असा विश्वासही श्री. भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला आहे.


गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलाशक्तीला सक्षम करण्याचे हे अभियान आणखीन तीव्र होणार आहे. गेल्या १० वर्षात मोदी सरकारने देशात जे कार्य केले तो येणाऱ्या २५ वर्षांसाठीचा पाया आहे. यवतमाळमध्ये याच गरीब, शेतकरी, युवावर्ग आणि नारीशक्ती या चार घटकांना सशक्त करणाऱ्या या कार्याची पायाभरणी झाली हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण झाले आहे. आज राज्यात सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली आहे, गरिबांना पक्की घरे मिळत आहेत, गावातील भगिनींना आर्थिक मदत मिळत आहे आणि युवा वर्गाचे भविष्य घडवणाऱ्या पायाभूत सुविधांची उभारणी होत आहे. विदर्भ आणि मराठवाडा दरम्यानच्या रेल्वे संपर्क सुविधेत सुधारणा करणारे नवे रेल्वे प्रकल्प आणि नव्या गाड्या सुरु झाल्या आहेत.
काँग्रेसच्या सत्ताकाळात दिल्लीहून पाठविलेल्या एक रुपयातील केवळ १५ पैसे लाभार्थ्याला मिळत असत. आत्ता केंद्रात जर काँग्रेस सरकार असते तर आज शेतकऱ्यांना मिळालेल्या २१ हजार कोटी रुपयांतील १८ हजार कोटी रुपये मध्येच कुठेतरी लुबाडले गेले असते. मात्र आता भाजपा सरकारच्या काळात, गरीबांसाठी पाठवलेले सगळेच्या सगळे पैसे गरिबांनाच मिळत आहेत. प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा संपूर्ण हक्क मिळवून देणे ही मोदींची गॅरंटी आहे, अशी ग्वाहीदेखील श्री. . भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे अनुप धोत्रे, किशोर पाटील जयंत मसने श्रीकृष्ण मोरखडे रावसाहेब कांबे, विजय अग्रवाल,. तेजराव थोरात, बाळासाहेब आपोतीकर चंद्रशेखर पांडे गुरुजी,. अशोक राठोड, प्रभाकर मानकर, बळीराम सिरस्कार वैशाली निकम, कुसुम भगत चंदा शर्मायांनी दिली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या