पत्रकाराला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी
मळसूर येथील एकाविरूध्द गुन्हा दाखल
प्रतिनिधी : नासीर शेख
पातूर : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत मळसूर येथे वरली मटका सुरू असल्याचे वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून मळसूर येथील पत्रकार राहुल सोनोने यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. पत्रकार राहुल सोनोने यांनी थेट चान्नी पोलीस स्टेशन गाठले, आणि रीतसर दिलेल्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी मळसूर येथील आरोपी अमर मोहन कंकाळ, यांच्याविरुद्ध शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहे.
0 टिप्पण्या