Ticker

6/recent/ticker-posts

राहुल गांधीनी केला संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान - आमदार सावरकर

राहुल गांधीनी केला संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान - आमदार सावरकर 


* भाजपा राज्यभर आंदोलन करणार 
*ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न 
           
             येथे पहा 🖕 काय म्हणाले राहुल गांधी????...
   
अकोला
कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, असा तिरपागडा आरोप करून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याने भाजपाने त्यांच्याविरुद्ध कंबर कसली असून शुक्रवारी जिल्हाभर निषेध आंदोलन घोषित ओबीसी आघाडी नेते बळीराम सिरस्कार, जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल, अनुप धोत्रेश्रीराम पुंडे दिलीप भरणे रवी गावंडे एडवोकेट देवाशिष काकड. श्रीकृष्ण तिडके रमेश प्रभाकर मानकर चंद्रशेखर पांडे गुरुजी, सजय जीरापुरे, संजय गोटफोडे यांनी माहिती दिली.

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, अकोल्यात भारतरत्न घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह व लोकशाही बचाव चे जनक जयप्रकाश नारायण चौक येथे तालुका केंद्रावर शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी 12.30 वा निषेध आंदोलन करणार असल्याची घोषणा भाजपा ओबीसी मोर्चाचे वतीने माधव मानकर यांनी केली. या आंदोलनात खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.



राहुल यांचे निर्लज्ज विधान

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, गुजरातमध्ये सन २००० मध्ये ओबीसीत आणली असून मोदी यांचा जन्म सामान्य जातीत झाला. त्यांनी कास्ट सेन्सेलला विरोध केला कारण त्यांचा जन्म ओबीसीत झालेला नसून सामान्य जातीत झालेला आहे असे बेताल व निर्ल्लज उदगार कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ओरिसातील सभेत काढले असून, राहुल यांचा हा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समजाचा अपमान आहे, असा आरोप आमदार रणधीर सावरकर यांनी केला .


ओबीसी विरोधात षडयंत्र
 , राहुल गांधी हे गांधी कुटुंबात जन्माला आले असून त्यांचा इटालियन कुटुंबाशी संबंध आहे. या लॉजिक प्रमाणे ते स्वत: भारतीय नागरिक ठरू शकत नाही. काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षण विरोधात राहली आहे. पंडीत नेहरू यांनी सन १९५३-५४ मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या सिफारशींचा विरोध केला होता. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला विरोध केलेला आहे. इंदिरा गांधीनी मंडल आयोग रद्दीत टाकला होता. माजी महापौर सुमनताई गावंडे यांनी सांगितले की की, राहुल गांधीच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत ; कारण त्या सर्व पूर्वी सामान्य वर्गात होत्या. पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे. एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा अशा जातींमध्ये जन्म झाला त्यांचे आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहे. कॉंग्रेस तेली समाजाला ओबीसी पासून वेगळे करण्याचा आणि ओबीसींचा एक वर्ग कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतके वर्ष धर्म आणि जातीवरून फूट पडून ते आता ओबीसीमध्ये सुध्दा फूट पाडत आहेत, असा आरोप भाजपा जिल्हा सचिव कुसुमताई भगत वैशालीताई निकम यांनी केला.


अनेक राज्यात कॉंग्रेसने ओबीसीचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना हे आरक्षण देण्याचे प्रकार केलेले आहे. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा कॉंग्रेसने कधीही दिलेला नाही. युपीए -२ च्या सरकारमध्ये संपूर्ण कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून केवळ एकाच ओबीसी व्यक्तीला स्थान देण्यात आले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना आरक्षण देता आले नाही. धनगरांच्या आणि गोवारी जमातीचा अनुसूचित जमाती आरक्षणाबद्दल कॉंग्रेसनेच घोळ निर्माण करून ठेवला आहे, असेही गीतांजली शेगोकार गजानन उंबरकर गणेश अंधारे रमेश करिअर निलेश निनोरे संजय इंगळे भाजप नेत्यांनी म्हटले . 


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या