चौहट्टा बाजार कॉम्प्लेक्समध्ये एकाच दिवसात दोन आढळले मृतदेह, परिसरात उडाली खळबळ
अकोट तालुक्यातील दहीहंडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चोहट्टा बाजारात एकाच दिवसात दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या मृतदेहांची माहिती मिळताच दहीहंडा पोलीस घटनास्थळी पोहोचले.दोन्ही मृतदेहांचा पंचनामा सुरू करण्यात आला आहे.चोहट्टा बाजारच्या पुलाजवळ मृतदेह नादुरुस्त अवस्थेत आढळून आला. संबंधित व्यक्तीची हत्या की अन्य काही कारणाने झाली याचा तपास पोलीस करत आहेत. आणि त्याच आवारात आणखी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.निलेश राणे असे मृताचे नाव आहे.तो रोहणा येथील स्थानिक रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.त्याच्या सोबत मयताच्या शेजारी किटकनाशकाचे बॉक्स सापडले आहेत. घरातील चाकूही सापडल्याची माहिती मिळाली आहे.या दोघांचा पंचनामा करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू केला असून दहीहंडा पोलिस करीत आहेत.



0 टिप्पण्या