Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी, सेवा हमी कायद्याचे केले उल्लंघन

शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी, सेवा हमी कायद्याचे केले उल्लंघन


अकोला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी सौ. सुचिता पाटेकर मॅडम यांच्या कडे असलेला प्राथमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार काढून त्यांच्या काळात प्राथमिक शिक्षण विभागात झालेल्या सेवा हमी कायद्याच्या उल्लंघनाची चौकशी होणेबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना भाजप पदवीधर सेल व महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष मनीष गावंडे यांनी पत्राद्वारे तक्रार दिली आहे.


अकोला माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. पाटेकर मॅडम यांच्याकडे माध्यमिक शिक्षण विभागासोबतच शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी (योजना) या तीन विभागाचा पदभार आहे. प्राथमिक शिक्षण विभागात दोन उपशिक्षणाधिकारी असतांनाही सौ. पाटेकर मॅडम यांच्याचकडे प्राथमिक शिक्षण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. यातच सौ. सुचिता पाटेकर मॅडम ह्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात कधीही पुर्ण वेळ बसत नाहीत. त्यांना केव्हाही विचारणा केली असता त्या मी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या कार्यालयात आहे किंवा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत दौ-यावर असल्याचे कारण सांगतात.


परंतु १ अधिकारी ३ विभागाचा पदभार ८ महीण्यांपासुन कसा सांभाळू शकते हा प्रश्न आहे. यातच मा. शिक्षणाधीकारी ह्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबतच राहावे लागत असल्याचे कारण सांगत असल्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प पडत आहेत. यामुळे अनेक प्रस्ताव महीनो-महिने प्रलंबित राहुन सेवा हमी कायदा पायदळी तुडवला जात आहे. याबाबत आपण शासन यंत्रणेकडून शिक्षण विभागाची दफ्तर तपासणी केल्यास सर्व कारनामे उघड होतील शिक्षणाधीकारी सौ. पाटेकर मॅडम यांच्या कार्यपद्धतीबाबत शासन दरबारी अनेक तक्रारी झाल्या आहेत. याबाबत आपण चौकशी गठीत केल्यास अनेक गंभीर प्रकार समोर येतील यात प्रामुख्याने न्यायालयीन प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाची वेळेत अंमलबजावणी न करणे, शहरातील सेंट्रलाईज किचन बंद करून पुन्हा प्रोसेस वेळेत न होणे, वरीष्ठ कार्यालयाच्या आदेशाची अंमलबजावणी वेळेत न करणे, २०% अनुदानित शाळा पात्र असतांना ८ महिने विलंबाने पात्रतेचे आदेश देणे. आदी अनेक बाबींचा समावेश आहे.

याबाबत त्यांना वारंवार विनंती करूनही काहीही परिणाम झालेला नाही. आपल्या पक्षाचे सरकार असल्यामुळे आम्हाला आंदोलनही करता येत नाही. यामुळे मा. महोदय आपणांस नम्र विनंती की, मा.सौ. पाटेकर मॅडम यांच्या कारभाराची सेवा हमी कायद्यानुसार चौकशी व्हावी. तसेच त्यांना CEO मॅडम कडील कामांकरिता आवश्यक असेल तर त्यांच्याकडे Additional CEO चा प्रभार देऊन अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागास स्वतंत्र शिक्षणाधिकारी देण्याची कृपा करावी ही नम्र विनंती. अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाद्य शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष मनीष गावंडे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्राद्वारे केली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या