Ticker

6/recent/ticker-posts

अखेर संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, १२ फेब्रुवारीला सह्याद्री अतिथीगृहात संपन्न बैठकीत दिले होते आश्वासन

अखेर संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, १२ फेब्रुवारीला सह्याद्री अतिथीगृहात संपन्न बैठकीत दिले होते आश्वासन



अर्थमंत्री अजित पवार यांनी अधि्वेषणात केली घोषणा




अकोला ---राज्यातील मायक्रो ओबीसी यांच्यावर होत असलेला अन्याय, धोबी समाज आरक्षण आणि बारा बलूतेदार यांच्या विकासासाठी सविस्तर चर्चा करून निर्णय घ्यावा यासाठी माजी आमदार बळीराम शिरस्कार यांच्या पत्राच्या आधारे भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र दिले होते. त्या पत्रानुसार १२ फेब्रुवारीला सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली व बैठकीला आलेल्या बारा बलुतेदार यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले होते. आणि आज राज्याचे अर्थसंकल्प सादर करताना अर्थ मंत्री नाम अजित पवार यांनी अखेर संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केल्याची घोषणा केल्याने बारा बलुतेदार महासंघाला मिळालेले यश असल्याचे बोलले जात आहे.

राज्यातील मायक्रो ओबीसी यांच्यावर होत असलेला अन्याय, धोबीसमाज आरक्षण आणि बारा बलूतेदार यांच्या विकासासाठी शासनाने कृती आराखडा तयार करावा व त्याची अंमलबजावनी करावी या मागणीसाठी बारा बलुतेदार महासंघाचे वतीने अनेकदा विविध मंत्री आणि अधिका री यांना निवेदने दिली तर अनेक वेळा आंदोलनेही केली आहेत. त्यानंतर १२ फेब्रुवारीला माजी आमदार बळीराम शिरस्कार यांच्या उपस्थितीत बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणरावं दळे, सतीश दरेकर, प्रताप गुरवं, चंद्रकांत गवळी, अनिल शिंदे अकोला , अशोक शेळके पुणे, धनंजय सिंगाडे लातूर,या शिष्ट मंडळासोबत सह्याद्री अतिथीगृहात संपन्न झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते. आणि आज अर्थ संकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असल्याची घोषणा केल्याने बारा बलुतेदारांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या