पालकमंत्री यांच्या शुभहस्ते बोलक्या रस्त्याचे लोकार्पण, ८५ लाख निधीतून मुख्य मार्गाचे सौंदर्गीकरण
पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते बोलका रस्ता अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत चा रस्ता लोकार्पण सोहळा हैदराबादच्या धरतीवर अकोला शहर भाजपाचा विकास पर्व म्हणून होणार साजरा. अकोला सौंदर्य करण्याच्या दृष्टीने शहरात अकोला मनपा अंतर्गत सौंदर्यकरण करण्यात आले आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारभिंती लगत सौंदर्गीकरण करण्याचे काम पुर्ण झाले आहे. 'सृष्टीवाचवा, झाडे जगवा झाडे लावा' असा संदेश देणारी दोन हाताच्या पंजाची प्रतिकृती येथे उभारून नागरिकांना पर्यावरण रक्षणाची कास धरण्याचा प्रशासनाच्यावतीने आग्रह करण्यात येत आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालया समोरच्या भिंतीवर करण्यात आलेल्या प्रकाश योजनेमुळे रात्रीच्या वेळी अकोला शहराच्या सौंदर्यात भरच पडत आहे.
सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे
हळूहळू चेहरामोहरा अकोला शहराचा बदलत आहे. सुशोभीकरणाच्या कामाला प्रथमच प्राधान्य दिले जात आहे. अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ज्या मार्गाला व्हीआयपी म्हटले जाते. त्या मार्गाची अवस्था सुधारली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजूला आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले असून, त्यासाठी ८५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. या सुशोभीकरणाच्या सुरक्षेचे आव्हानही प्रशासनासमोर असून, त्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अकोला शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदान ते जेल चौकापर्यंत आलेल्या उड्डाण पुलाचे सौंदर्य नुकतेच पुर्ण झाले आहे.
अतिक्रमण नियंत्रणासाठी अकोला मनपाचा प्रयत्न
रस्त्याच्या कडेला जिथे मोकळी जागा आहे तिथे अतिक्रमण पाय पसरत आहे. व्हीआयपी मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची अवस्थाही अतिक्रमणामुळे बिकट झाली आहे. रस्त्याच्या उजव्या बाजूला खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणला आळा बसावा यासाठी ठोस प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलून या परिसरात अतिक्रमणला आळा घातला आहे. यासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत ८५ लाखाच्या निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे.
हुतात्मा स्मारक येथे रणगाडा ठेवून करण्यात आले सुशोभीकरण
पाकिस्तान सैनिकांना धडा शिकविणारा रणगाडा आता अकोल्यातील नेहरूपार्क समोरील हुतात्मास्मारक येथे बसविण्यात आला आहे. भारतीय सैन्यातील टी-५५या रणगाड्याचे स्मरण आणि भारतीय सैन्यासह त्यांच्या दीर्घ वर्षाच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी हा रणगाडा ठेवण्यात आला असून, नवीन पिढीस प्रेरणा देणारा ठरत आहे. तसेच महानगरात हा रणगाडा आकर्षणाचा बिंदू ठरला आहे.
पाकिस्तान सैनिकांना धडा शिकविणारा 👇 हाच रणगाडा





0 टिप्पण्या