Ticker

6/recent/ticker-posts

चान्नी ठाण्याचे उपनिरीक्षक पदी संजय कोहळे

चान्नी ठाण्याचे उपनिरीक्षक पदी संजय कोहळे


प्रतिनिधी नासीर शेख 
पातूर : पातुर तालुक्यातील चान्नी ठाण्याचे उपनिरीक्षक पदी संजय कोहळे रुजू झाले असून ,त्यांनी बुधवार दि.७ फेब्रुवारी रोजी चान्नी ठाण्याचा उपनिरीक्षक पदाचा पदभार सांभाळला  आहे.उपनिरीक्षक संजय कोहळे  हे गेल्या ३५ वर्षापासून पोलीस विभागात सेवा देत आहे.ते   अमरावती ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत होते, चान्नी ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक गणेश महाजन यांची गेल्या काही दिवसापूर्वी माना पोलीस स्टेशन येथे बदली झाली, त्यांच्या जागी अनुभवी अधिकाऱ्यांची मागणी ठाणेदार विजय चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केली  होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातून बदलून आलेल्या उपनिरीक्षकापैकी
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी  उपनिरीक्षक संजय कोहळे यांची बदली चान्नी ठाण्यात केली असून,त्यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे.


प्रतिक्रिया
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार चान्नी ठाण्याचे उपनिरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे- संजय कोहळे उपनिरीक्षक पोलीस स्टेशन चान्नी


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या