Ticker

6/recent/ticker-posts

पातुर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराला उधान घरकुलापासून गरजू वंचित

पातुर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराला उधान घरकुलापासून गरजू वंचित


प्रतीनीधी-  गुलाब भाऊ अंभोरे
अकोला- 3 फेब्रुवारी 24 तालुका पातुर जिल्हा अकोला प. स. पातूर येथील कर्मचाऱ्यांचा खूपच भ्रष्टाचार दिसून येत आहे. प. स. मधून माहिती अधिकारी अर्ज, घरकुल फाईल गहाळ होतात. चोरला जातात, पंचायत समितीच्या यांत्रनेमधून अर्ज गहाळ कसे होतात ही गांभीर बाब आहे. पंचायत समिती BDO आणि तेथील कक्ष अधिकारी यांची आवक जावक विभागावर नियंत्रण असुन सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्या जबाबदारी शिवाय कोणताच अर्ज गहाळ होऊ शकत नाही. दिनांक - 18 जानेवारी 24 ला  माहितीचा अधिकार हा अर्ज पातूर पंचायत समिती ला प्राप्त झाला होता. अर्जाची O.C. आणि आवक जवक रजिस्टर मध्ये नोंद आहे. दिनांक 2 फेब्रुवारी 24 ला अर्जाची कामा ची विचारना केली असता आवक कक्ष, घरकुल ऑपरेटर आतिश पवार तसेच कक्ष सहाय्यक किशोर बर्डे, तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी घुले साहेब, आणि BDO अगर्ते साहेब यानी अर्जाचा तपास केला असता गहाळ असलेला अर्ज मिळाला नाही. पातूर पंचायत समिती मधील वीवरा ग्रामपंचायत मधील चाललेला भ्रष्टाचार, वारंवार घरकुल ची यादी बदलणे, यादी मधून गरजू नागरीकांचे नाव वगळणे, पैसे घेऊन पंचायत समिती ला फाईल पाठवणे घरकुळची जियो टकींग न करणे, असा ग्रामपंचायत पासुन तर पंचायत समिती पर्यंत भ्रष्टाचार होत आहे. हा भ्रष्टाचार थांबवायला पाहिजे. गहाळ केलेला अर्जाचा विचार केल्याशिवाय पुढील घरकुल आणि हप्ते थांबविण्यात येतील ही सर्व जबाब दरी BDO ची आहे. तसेच संबंधित अधिकारी यांनी या कडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या