Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत अचानकपणे मृत्यु व्यक्तीच्या परिवाराला दिला आधार 

मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत अचानकपणे मृत्यु व्यक्तीच्या परिवाराला दिला आधार 


अकोला- पीडित वंचित संकटात सापडलेल्या परिवाराला मदत करणे ही मानवता संस्कृती व कर्तव्य व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची किमया त्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारची असून समाज हित राष्ट्रहित सोबत मानवता धर्माचा पालन करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिकवण राज्य सरकार अंगीकार करून कार्यरत असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय स्थित पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील जनसंपर्क कार्यालयात पोलीस भरती दरम्यान 28 ऑगस्ट रोजी वसंत देसाई ग्राउंड वर अचानकपणे कोसळून मृत्यूमुखी झालेल्या रोशनी अनिल वानखडे या विद्यार्थींच्या परिवाराला एक लाख रुपये तर 14 मे रोजी तेलंगणा येथील सरस्वती माताचे दर्शन करून बारस येथील गोदावरी नदीमध्ये स्नान करताना वाहून गेलेले प्रतीक महेश गावंडे व किरण चंद्रशेखर लटकुटे यांच्या परिवाराला मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत प्रत्येकी एक लक्ष रुपये चा धनादेश देताना ते बोलत होते.


 मनुष्याची किंमत कर्तव्य मोठे असताना निधी देऊन त्यांच्या परिवाराला आधार देण्याचं काम राज्य सरकार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी विजय पाटील, तहसील अधिकारी तलाठी पटवारी तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव मानकर अंबादास उमाळे संदीप गावंडे गणेश अंधारे निलेश निनोरे मिलिंद राऊत नितीन राऊत नितीन गवळी गोपाल मुळे राजेश वगारे, रमेश ठाकरे राजेश ठाकरे विठ्ठल चतर कर पंकज वाडी वाले, देवेंद्र देवर प्रवीण हगवणे, राजेश बेले शंकरराव वाकोडे राजेश नागमते मधुकर पाटकर अनिल नावकार प्रशांत अवचार गणेश तायडे किशोर कुचके दिलीप पटोकार, अभिजीत बांगर, केशव हेडा आधी प्रामुख्याने उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या