सीताबाई महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान संपन्न
अकोला येथील दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता व्याख्यान आयोजित केले. या व्याख्यानाकरिता अमरावती येथील राज्यशास्त्राचे अभ्यासक तथा आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्रा. डॉ. देवलालजी आठवले हे प्रमुख वक्त म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी दि बी.जी.ई. सोसायटीचे मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी हे प्रमुख उपस्थिती मध्ये नियोजित होते. प्रमुख प्रमुख उपस्थितीमध्ये सोसायटीचे माजी पदाधिकारी माननीय अनिलजी तापडिया हे लाभले होते.
आजच्या काळामध्ये विद्यार्थी शिक्षणापासून थोडासा भरकटलेला दिसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रसंगीकता लक्षात घेऊन आजच्या विद्यार्थ्यांचे मनोबल अधीक मजबूत करण्याची गरज आहे. काळ झपाट्याने बदलत आहे. नवी आव्हाने रोज पुढे येत आहेत. स्पर्धेच्या आणि परिवर्तनाच्या काळात डॉ. आंबेडकरांचे विचार आपल्या कसे प्रेरक आहेत याची सूत्रबद्ध मांडणी डॉ. देवलाल आठवले यांनी केली. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे, दिशा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग उलगडून विषयाची मांडणी केली. आज आपण अत्यंत चांगल्या परिस्थितीत जीवन जगत आहोत. तुलनेने आज तेवढा संघर्ष नाही तरीही आपण स्वतःला का घडवत नाही असा प्रश्नही उपस्थित केला.
संविधान आहे म्हणून ही लोकशाही टिकून आहे. त्यामुळे संविधान जोपासण्याची आज सर्वांवर जबाबदारी आहे. आजच्या काळाला अनुसरून आंबेडकरी विचारसूत्राची मांडणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांनी महाविद्यालयाच्या विकासाचा चढता आलेख मांडला. नुकताच सीताबाई महाविद्यालयाला नॅक द्वारा A+ दर्जा प्राप्त झाला असल्याकारणाने महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे मनोबल तर उंचावले आहेच परंतु A+ दर्जाच्या कॉलेजमध्ये शिकताना विद्यार्थ्यांना सुद्धा अभिमानास्पद वाटते. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले विचार दिले जावे, या अनुषंगाने महाविद्यालय दरवर्षी प्रयत्न करीत असते महापरिनिर्वाण दिनाच्या या व्याख्यानाची उज्वल व प्रदीर्घ अशी परंपरा उलगडून प्राचार्य महोदयांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
अध्यक्षीय भाषणांमधून ऍड. मोतीसिंह मोहता यांनी वर्तमान जीवनातील समस्यांवर प्रकाश टाकला. शिक्षणाची दालने आज सर्वांसाठी खुली आहेत. दि बी. जी. ई. सोसायटीचा दर्जेदार शिक्षण देण्याच्या अनुषंगाने नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन राहिलेला आहे आणि सीताबाई महाविद्यालय हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. महामानवाचे विचार अंगीकारून विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधली पाहिजे असा विचार मांडला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सीताबाई जैन यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन या हेतूने भीमगीत आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी एक स्वागतगीत सुरुवातीला सादर केले. कार्यक्रम प्रसंगी स्टेजवर रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष सचिन उपर्वट, सचिव साहिल भारसाकळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी ख़ुशी डोंगरे, साक्षी पाखरे उपस्थित होते. सचिन ऊपरवाट यांनी आपल्या मनोगत मधून रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनची भूमिका मांडली. या कार्यक्रमासाठी अकोला शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक आणि गावकरी मंडळी आवर्जून उपस्थित राहतात तसे याही वर्षी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. कैलास वानखडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय एम. ए. राज्यशास्त्र भाग दोन चा विद्यार्थी संकेत शिरसाठ यांनी करून दिला तर आभार डॉ. प्रसन्नजीत गवई यांनी मानले. कार्यक्रमाकरिता महाविद्यालयीन कर्मचारी वृंद, प्रतिष्ठित नागरिक तथा विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या