प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव पुरस्काराने निलेश सोमाणी सन्मानीत
प्रतिनिधी/
वाशिम : स्थानिक वाटाणे लॉन येथे रिपाइं आठवले गटाच्यावतीने आयोजित भूमी हक्का परिषदेत संघर्षनायक केंद्रीय सामाजीक मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्या उपस्थितीत सामाजीक कार्यकर्ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांना सामाजीक कार्याबद्दल प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरव पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व बुके होते.
श्री. गुरुदेव सेवा मंडळ जिल्हास्तरीय बैठकीत सर्वानुमते ठराव पारित : गुरुदेव भक्ताचा मोठा प्रतिसाद
प्रतिनिधी/
वाशिम : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा प्रसार, प्रचार, ग्रामगीता घरोघरी पोहचविण्यासाठी कार्य करणार्या श्री. गुरुदेव सेवा मंडळ जिल्हास्तरीय बैठक स्थानिक आययुडीपी कॉलनी येथील श्री संत गजानन महाराज मंदिर सभागृहात 14 जानेवारी रोजी उत्साहात पार पडली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सुनिल दशमुखे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जनसेवक संजु आधार वाडे, मा. जिल्हा सेवाधिकारी लक्ष्मणराव आवटे, सामाजीक कार्यकर्ते निलेश सोमाणी, प्रबोधनकार पंकजपाल महाराज, दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर कव्हळे महाराज, जि.प. सदस्य दौलत इंगोले, प्रा. अनुप नांदगांवकर, सुधाकर राऊत, प्रफुल बानगावकर, श्याम सवाई, सौ. सरस्वती ढेकळे, सौ. सोनु म्हातारमारे, सौ. ज्योती उगले, धनश्री पाटील समवेत पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत वाशिम येथे भव्य दिव्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव घेण्याचा ठराव पारीत करण्यात आला. यावेळी सर्वानुमते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा उपसेवाधिकारी निलेश सोमाणी यांची एकमताने निवड करण्यात आली. सोबतच जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रबोधनकार ह.भ.प. पंकजपाल महाराज यांची निवड करण्यात आली.
यावेळी महोत्सव समितीमध्ये सहस्वागतअध्यक्ष म्हणून संजु आधार वाडे, प्रा. भाऊसाहेब काळे, जि.प. सदस्य दौलत इंगोले, ज्ञानेश्वर कव्हळे महाराज यांचा समावेश करण्यात आला आहे.
सोबतच लवकरच पुण्यतिथी व जयंती समितीची निवड करण्याचे सर्व अधिकार सोमाणी व पंकजपाल महाराज यांना ठरावाद्वारे देण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी प्रबोधन यात्रा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला. वाशिम तालुक्यातील सहाही तालुक्यात ही यात्रा वाहनाद्वारे काढण्यात येवून यामध्ये प्रबोधनकार पंकजपाल महाराज मार्गदर्शन् करणार आहेत. पुण्यतिथी महोत्सवामध्ये विविध समाजसेवकांना पुरस्काराचे वितरण तथा सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्याचाही निर्णय पारीत करण्यात आला. यावेळी ह.भ.प. सुनिल दशमुखे, जनसेवक संजु वाडे, निलेश सोमाणी, पंकजपाल महाराज, प्रा. नांदगांवकर, दौलत इंगोले, ज्ञानेश्वर कव्हळे यांनी आपले विचार मांडले. सदर बैठकीचे प्रास्ताविक श्याम सवाई, संचालन प्रफुल बानगावकर तर आभार सुनिल दशमुखे यांनी मांडले. राष्ट्रवंदनेने बैठकीची सांगता करण्यात आली. बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या