शहर झगमगले श्री रामने, सुमिरमा फाउंडेशन ने सजवले टॉवर, चौकाचौकात श्री राम मंदिराच्या प्रतिकृतींची सजावट
२२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी आपल्या देशातील सर्वात मोठा ऐतिहासिक दिन अयोध्यामध्ये प्रभु श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त अकोला शहरातील आकर्षण असलेले सुंदराबाई खंडेलवाल टॉवर येथे सुमिरमा फाउंडेशन द्वारा भव्य भारतीय राष्ट्रध्वजाचा तिरंगा लायटिंगच्या स्वरुपात टॉवरला सुशोभित करून आणि त्याचबरोबर श्री रामरक्षा स्तोत्र पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे.
जुने शहरातील डाबकी रोडवरील संत गजानन महाराज मंदिरापासून शोभायात्रि काढण्यात आली. चौकाचौकात श्री राम मंदिराच्या प्रतिकृतींची सजावट श्रीराम विविध प्रकारचे चित्र व रंगोटी तसेच विविध संगीतमय कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. बाजारपेठ तसेच प्रत्येक घरावर भगवे झेंडे लावून आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे.
हा दिवस तब्बल ५०० वर्षांनतर रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात विराजमान होणार आहेत, या पृष्ठभुमीवर प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी आणि पूजनासाठी अकोला नगरी सजत असून प्रत्येक रामभक्त आपल्या घरावर, प्रतिष्ठानावर आणि इमारतीवर रामाचे चित्र असलेले भगवे ध्वज आहे या भगव्या झेंड्यांनी अकोल्याची बाजारपेठ सजली असून रामभक्तांकडून या झेंड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. चौका चौकामध्ये भगवे ध्वज, पताका लावण्यात आले आहे. तसेच स्वागत कमानी आणि मर्यादा, पुरुषोत्तम भगवान श्रीरामांचे स्वागताचे बॅनर्स झळकत आहेत. अयोध्येत श्रीराम मंदिराचा भव्यदिव्य सोहळा सोमवारी होणार आहे. त्यामुळे २२ जानेवारीला राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. सदर शासन आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला असून यामूळे सोमवारी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालये आस्थापना बंद राहणार आहेत. तर तिकडे केंद्र सरकारने 'हाफ डे' आधीच जाहीर केला आहे.
0 टिप्पण्या