महीलेची फसवनुक करणारे ०२ आरोपी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ४८ तासात वर्धा येथून आरोपींना अटक
दिनांक १७ जानेवारी २४ रोजी फिर्यादी नामे श्रीमती मायाबाई राजु खुळे वय ३४ वर्ष रा. गाडगे नगर, अकोला यांच्या तक्रारीवरून किल्ला चौका कडुन घरी जात असता, अनोळखी ईसम त्याचे जवळ येवून म्हणाले की, तुम्ही माझे आई सारख्या आहात पोळा चौकाकडे साड्या वाटप करीत आहे. तुम्ही माझे सोबत चला असे म्हटल्याने मी त्याचे सोबत गेली असता काल भैरव मंदीराजवळ गल्लीमध्ये त्यांनी गळ्यातील सोन्याचे दागिणे काढायाला सांगितले, गळयातील दागिने काढून पॉकेट मध्ये ठेवली आणि पॉकेट मधील नगदी ३०००/-रू व सोन्याची मनी असा एकुण ८०००/-रूचा माल दोन अनोळखी ईसम घेवून गेले अश्या फिर्यादीचे जबाणी तक्रारवरून पो. स्टे जुने शहर अकोला येथे अपराध कमाक ८०/२४ कलम ४२०,३४ भा.दं.वि चा नोंद असून तपासावर आहे. सदर घटनेने महिला वर्गात भिती निर्माण झाली होती.
त्याची पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी यांना निष्पन्न करण्याबाबत पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी आदेशीत केले असता, स्थानीक गुन्हे शाखा प्रमुख यांनी एक पथत गठीत करून त्यांना मिळालेली गोपनिय माहीतीदार यांचे मार्गदर्शन करून सदर गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करण्याबाबत आदेशीत केले असता, पथकाने गोपनिय यंत्रना अमलात आणून सदर गुन्हयातील आरोपी नामे १) सुरज मिश्रीलाल कंजरभाट वय ३६ वर्ष रा. ईतवारा बाजार पोलीस चौकी समोर वर्धा २) सुनिल ईश्वर नेतलेकर वय ४३ वर्ष रा. ईतवारा बाजार, कंजर मोहल्ला पोलीस चौकी समोर वर्धा यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न करून, त्यांना वर्धा येथून ताब्यात घेवून त्यांचे कडून गुन्ह्यातील वाहन हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले. तसेच वर नमुद आरोपीतांना सखोल विचापूस केली असता सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी मागिल ०५ वर्षा पासून अकोला जिल्ह्यात व इतर जिल्हयात अश्या प्रकारे बतावणी करून फसवणूकीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये त्यांनी अकोला जिल्हयात केलेल्या गुन्हयाचे अभिलेखावर पाहणी केली असता पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला येथील अप नं ४८४/२२ कलम ४२० भादंवि आणि पो.स्टे जुने शहर अप.नं ३९१/२२ कलम ४२०,३४ भादंवि, पोस्टे बाभुळगाव जि. यवतमाळ अप नं ५८०/२२ कलम ४२०,३४ भादंवि अश्या प्रकारचे दाखल असून त्यांनी सदर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीतांची टोळी ही पोलीसांनी पहिल्यांदाच उजेडात आणली आहे. स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाने सदर गुन्हा घडल्यानंतर गोपनिय बाबतमीदाराकडून सदर गुन्हा उघड आणून आंतरजिल्हा गुन्हे करणा-या टोळीस जेरबंद करण्यात यश मिळविले असून आरोपीतांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन जुने शहर यांचे ताब्यात दिले आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अकोला बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब, पो.नि. शंकर शेळके, यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास डी. भगत, पोउपनि. गोपाल जाधव, अमंलदार रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र गलिये, अविनाश पाचपोर, वसीमोद्दीन शेख, एजाज अहेमद, विशाल मोरे, भिमराव दिपके, यांनी केली असून स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांचे सहकार्य लाभले.तरी पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, सद्या मकरसकांती निमीत्याने महिला वर्ग हळदी कंकूच्या कार्यक्रमासाठी किमती आभूषने / दागिने परिधान करून जाण्याची प्रथा आहे. त्या साठी पोलीसांकडून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सावधान! तोतया सैन्य अधिकारी बनून फसवणूक कणारे सज्ज...
मागच्या कित्येक दिवसांपासून अज्ञात व्यक्ती किंवा समूह जिल्ह्यातील सभासदांना फोन कॉल व व्हाट्सअॅप द्वारे औषध व जनरल वस्तूंची मागणी करीत आहे स्वतःला सैन्य दलाचा अधिकारी सांगून दबाव टाकून दिलेल्या ऑर्डर चा माल पाठवा व पेमेंट करतो सांगून क्रेडिट कार्ड, डेविट कार्ड व यू पी आय पेमेंट बद्दल गोपनीय माहिती विचारतो काही सभासद दबावाला बळी पडून विचारलेली माहिती देण्यास भाग पडू शकतो. खालील दिलेल्या नंबर वरून व्हाट्सअॅप व फोन कॉल येत आहेत. ७८९६५४९११९,८४७२९०२५९७,८०९९२५४०३६,९५१६३५६८९४,७५०११४६२५६ ,७६३८०२६६१४,८८१७२८००५३ व ८८७६२०९९८१ कृपया करून आपण सदर प्रकरणावर जातीने लक्ष घालून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदन डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन संघटनेच्या पदाधिकरी यांनी निवेदन सादर केले आहे.
महावितरण कंपनीच्या तारांची चोरी करणारी टोळी गजाआड, तब्बल 6 आरोपी अटक, 02 दुचाकीसह 128000/- रु.चा मुददेमाल जप्त करुन 07 गुन्हयाची उकल करण्यात दहिहांडा पोलिसांना यश !
दिनांक-11 जानेवारी 2023 रोजी महावितरण कंपनीची केळीवेळी फिडर मध्ये 14 इलेक्ट्रिक पोलवरची सुमारे 280 किलो अॅल्युमिनिअम ची तार चोरी गेली असल्याबाबत महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी तक्रार नोंदविल्यावरुन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल झाला. त्यांनतर लगेचच दिनांक-15 जानेवारी अः2023 रोजी चोहोटटा बाजार येथुन 120 किलो अॅल्युमिनियम तार चोरी गेल्याबाबत दुसरा गुन्हा नोंद करण्यात आला. लगातार महावितरणच्या तारचोरीचे दोन गुन्हे दाखल झाल्याने मा. पोलिस अधिक्षक सा. अकोला, अप्पर पोलिस अधिक्षक सा, अकोला, यांनी सदरचे गुन्हे तात्काळ उघड करणेबाबत निर्देश दिल्याने मा. उपविभागिय पोलिस अधिकारी सा. अकोट श्री. अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन दहिहांडा चे ठाणेदार सपोनि योगेश वाघमारे, पोउपनि अरुण मुंढे, यांनी एक तपास पथक नेमुण अश्या प्रकारच्या यापूर्वी झालेल्या गुन्हयाचा सखोल अभ्यास करुन त्याबाबत गोपनिय यंत्रणा यांचे मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित इसम नामे-1) अमोल दिनकर बघे वय-22 वर्षे 2) चेतन सुभाष मेहेंगे वय-23 वर्षे, ३) रोशन दादाराव रामचौरे वय-21 वर्षे 4) राहुल संजय मेहेंगे वय-21 वर्षे 5) नागेश राजु सुलताने वय 19 वर्षे 5 महिने 6) विकास गजानन रामचौरे वय-21 वर्षे सर्व रा.नखेगाव ता. अकोट जि. अकोला यांना ताब्यात घेतले असता सदर संशयित आरोपितांनी सदर लगातार झालेले दोन गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यावरुन सदरसंशयित
आरोपितांना अटक करुन मा. न्यायालयासमक्ष हजर करुन त्यांचा पोलिस कोठडी रिमांड मंजुर करुन घेउन त्यांचेकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी पो स्टे दहिहांडा हददीमध्ये यापुर्वी दाखल झालेले चार गुन्हे व पो. स्टे उरळ हददीत एक गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
गुन्हयातील आरोपितांकडुन त्यांनी गुन्हे करतेवेळी वापरलेल्या दोन मोटारसायकली किंमती -65000/- रुपये आणि त्यांनी संगणमताने चोरलेली तार विकुन मिळविलेली रक्कम - 63000/- रुपये असे एकुण-128000/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन सदर आरोपितांकडुन एकुण 7 गुन्हयांची उकल केली आहे. तसेच सदर सहा अटक आरोपितांना मा. अतिरिक्त सत्र न्यायालय अकोट यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच सदर गुन्हातील पाहिजे असलेले दोन आरोपी नामे-1) अर्जुन रविंद्र मुंडाले 2) योगेश रामराव मुंडाले दोन्ही रा. नखेगाव यांनी पो.स्टे उरळ हददीत पोलिस वाहनावर झालेल्या गोळीवारामध्ये यापुर्वी अटक आहेत. पुढील तपास दहिहांडा पोलिस करित आहेत.
सदरची कार्यवाही मा. पोलिस अधिक्षक श्री. वच्चनसिंह साहेब, अप्पर पोलिस अधिक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, सहा. पोलिस अधिक्षक श्री. अनमोल मित्तल साहेब, यांचे मार्गदर्शनात दहिहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सपोनि योगेश वाघमारे, पोउपनि अरुण मुंढे, स.फौ. अरुण घोरमडे, पोहेकॉ-सुदेश यादव, पोहेकों-कमोद लांडगे, पोहेकॉ अनिल भांडे, पोहेकों-नंदकिशोर चोपडे, पोहेकॉ सुरेश ढोरे, पोहेकॉ विनोद साळवे, पोहेकॉ राजेश राठोड, नापोकों-विजयसिंह चव्हाण, पोकों- रामेश्वर भगत, पोकों-मनिष वाकोडे, पोकॉ योगेश करनकार, पोकों-राहुल खंडवाय तसेच चालक नामे- सफौ-महाजन, पोहेकों- सुधीर कोरडे, पोकों- सतिश राठोड, पोकॉ- हेमंत दासरवार यांनी केली.
0 टिप्पण्या