पोलीस निरीक्षक गजाननजी धंदर यांचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून गौरव
वाशिम-शुक्रवार दि.१९/०१/२४ रोजी कारंजा (लाड) येथील पोलीस स्टेशन ग्रामीणचे तत्कालीन ठाणेदार व सद्यस्थितीत वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजाननजी धंदर यांचा त्यांच्या कारंजा येथील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदारपदी असताना केलेले उत्कृष्ट प्रशासकीय नियोजन, ग्रामीण विभागात गुन्हेगारीवर वचक तसेच बरीच प्रकरणे सामोपचाराने आपसात मिटवून एक नवा पायंडा त्यांनी पाडल्यामुळे नाथसमाजकार्यासाठी राज्यस्तरावर प्रसिद्ध अशी वैदर्भीयनाथ समाज संघ या संघटनेद्वारे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून गजाननजी धंदर यांचा स्थानिक वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे सन्मान प्रमाणपत्र,शिल्ड, पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.सदर सत्कार कार्यक्रमाला वैदर्भीय नाथ समाज संघाचे अध्यक्ष एकनाथजी पवार,सचिव संतोषनाथजी सातपुते, वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी गजानननाथजी खंडाळकर, राजुनाथजी तायडे, रविंद्रनाथ इंगळे,विदर्भ लोककलावंत संघटना वाशिम अध्यक्ष संजयजी कडोळे, नारायण गुंजाळकर,घनवट इत्यादी उपस्थित होते.
0 टिप्पण्या