सीताबाई महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील २ विद्यार्थी गुणवत्ता यादित
दी बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित व नुकतेच नॅक द्वारा अ + चा दर्जा प्राप्त सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाची मेरिट ची परंपरा यावर्षीही कायम राहिलि. नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी २०२३ मध्ये घेतलेल्या परिक्षेची गुणवत्ता यादी जाहिर केली ज्यामधे अकोला येथील सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे २ विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविल. यामध्ये २ री मेरिट म्हणून कु जयश्री जानराव तायडे (रा. आसलगांव) तर ९ वा मेरिट म्हणून सुरज सुभाष वानखडे ( रा. खिरपुरी ) यांनी स्थान मिळविले. दोघेही ग्रामीण भागातील परंतु शिक्षणाची कास असलेल्या विद्यार्थ्यांनी या यादित स्थान मिळविल्यामुळे संस्थे चे अध्यक्ष ॲड मोतीसिंहजी मोहता व मानद सचिव डॉ पवनजी माहेश्वरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर डि सिकची यांनी अभिनंदन केले तर त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडिल व विभाग प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई व अर्थशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांना दिले.
0 टिप्पण्या