Ticker

6/recent/ticker-posts

शिवछत्रपतींचा आदर्श युवकांनी आत्मसात केला पाहिजे!- अनुप धोत्रे

शिवछत्रपतींचा आदर्श युवकांनी आत्मसात केला पाहिजे!- अनुप धोत्रे


बाळापुर
       मूठभर एकजिवाच्या मावळयांना सोबत घेऊन शिव छत्रपतींनी रयतेचे म्हणजे जनतेचे राज्य उभे केले होते या राज्यात प्रत्येक व्यवसाय करणारा माणूस स्वयंपूर्ण होता अठरापगड जातीमधील लोक गुण्यागोविदानं नांदत होते तोच आदर्श घेऊन देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी विश्वकर्मा हि योजना सुरू करून अठरापगड जातीमधील काम करणाऱ्या कारागिरी लोकांना स्वयंपूर्ण करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे शासनाने हाती घेतलेल्या या योजनेत सर्वानी सहभागी होऊन शिवछत्रपती ना अपेक्षित असलेले रयतेचे राज्य निर्माण करावे आणि हे काम युवाशक्तीच करू शकते म्हणून युवकांना मी आवाहन करतो की छत्रपतीचे शिवचरित्र वाचून ते आत्मसात करा म्हणजे एक आदर्श समाजनिर्मिती करण्यास मदत होईल असे प्रतिपादन अकोला लोकसभा प्रमुख अनुप धोत्रे यांनी केले.


     यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे, शेतकरी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे, बाळापुर विधानसभा प्रमुख बळीराम सिरस्कार, मा जि प सदस्य रामदास लांडे,जिल्हा उपाध्यक्ष गणेश तायडे,बाळापुर तालुका अध्यक्ष अंबादास घेंगे, ओबिसी आघाडी जिल्हाध्यक्ष आनंद पुंडे,अल्पसंख्य तालुका अध्यक्ष मुक्तार खान,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष ऋषिकेश ताथोड,महिला अध्यक्ष अर्चना मसने,वैद्यकीय सेल सरचिटणीस किशोर कुचके, तालुका सरचिटणीस सुनील मानकर,राजेश्वर वैराळे, विपुल घोगरे, साहेबराव पाटील सुरेश कवळकार सुनील लांडे,ता उपाध्यक्ष रवींद्र लांडे विजय लोनाग्रे गोपाल लांडे अनिल लांडे विलास सोनोने बळीराम पारस्कर गजानन होनाळे संतोष पाटील दत्ता आखरे अभि पाटील विठ्ठल निकोले रवी निकोले शाम घोंगे संत सेना महाराज सेवा समिती, संत सावता महाराज सेवा समिती, संत गोरोबा काका मित्र मंडळ, छत्रपती प्रतिष्ठान, काळा मारोती मंदिर सेवा समिती, शिव मंदिर सेवा मित्र मंडळ जय बजरंग व्यायाम शाळा पारस सातारगाव हिंगणा कुपटा कोळसा मांडोली शेळद परिसरातील सर्वसरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टी चे बूथ प्रमुख पदाधिकारी सर्व कार्यकर्ते व सर्व पंचायत क्रोशीतील नागरिक उपाशीत होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या