Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच शंभुराज देसाई यांची विधानपरिषदेत घोषणा, जुनी पेंशन योजना लागू

सौ. संगिताताई शिंदे यांच्या 15 वर्षांपासूनच्या अथक परिश्रमाला व  प्रदीर्घ लढ्याला यश


राज्यातील सर्व विना अनुदानित, अंशतः अनुदानित पदांवर व तुकड्यावर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्याशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू होणार

        सविस्तर वृत्त येथे 👆 पहा...

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच शंभुराज देसाई यांची विधानपरिषदेत घोषणा


वित्त विभागाची मान्यता; लवकरच शासननिर्णय निर्गमित होणार, न्यायाचा विजय, राज्यातील 26 हजार कर्मचारी बांधव आता सन्मानाने जीवन व्यतीत करणार; हीच माझ्या आयुष्याची खरी कमाई- सौ. संगीताताई शिंदे

 राज्यातील सर्व विना अनुदानित, अंशतः अनुदानित पदांवर व तुकड्यावर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेंशनचा सुटला असून वित्त विभागाने सहमती दर्शवली आहे.याबाबतचा अधिकृत शासननिर्णय लवकरच निर्गमित होणार आहे.
                 जुन्या पेंशनबाबत राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे साहेब यांनी विधानसभेत तर शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत जुनी पेंशन योजना लागू केल्याची अधिकृत घोषणा आज केली.
        महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अंतर्गत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला असून याचा लाभ राज्यातील 26000 कर्मचारी बांधवांना होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी विधानसभेत घोषित केले.



                जुन्या पेंशनची अधिकृत घोषणा केल्याबाबत सौ. संगीताताई शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, शिक्षणमंत्री दिपकजी केसरकर साहेब, राज्यातील सर्व माजी व कार्यरत असणारे आमदार साहेबांचे आभार मानले.राज्यातील 26000 कुटुंबाना न्याय देण्याच्या कामात जिवन सार्थकी लागल्याचे व परिश्रमाचे फळ मिळाल्याची भावना यावेळी सौ. संगीताताई शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन कोअर कमिटीची संपूर्ण टिम व राज्यभरातील 26 हजार शिक्षक बांधवांना शुभेच्छा देऊन अभिनंदनही केले.
               पेंशनवाली ताई, रणरागिणी, वाघीण अशा विविध नावाने संपूर्ण राज्यभर परिचित असलेल्या सौ. संगीताताई शिंदे ( बोंडे ) मॅडम ह्या जुन्या पेंशनचा लढा गेल्या 15 वर्षांपासून लढत होत्या. आज त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लढ्याला यश मिळाले आहे. अतिशय खडतर व कठीण प्रसंगात हार न मानता दिल्ली, मुंबई, नागपूर येथे लढा दिला. राज्यभरातील पेंशन पीडित बांधवांना एकत्रित आणून त्यांच्यामध्ये लढण्याची ऊर्जा, चेतना निर्माण करण्याचे काम सौ. संगीताताई शिंदे यांनी केले. अखेर पेंशनचा लढा आज यशस्वी झाला. ताईच्या कार्याला, जिद्दीला व प्रयत्नाला सलाम. जुन्या पेंशनसाठी ताईचे कार्य व योगदान अभिनंदनीय आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या