मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षी निमित्त गीतांचा संग्रह उपलब्ध करावा- आ सावरकर
अकोला- संगीत साधना करणारे सात हजार पेक्षा जास्त गीत गाणारे कोट्यावधी संगीत प्रेमावर साम्राज्य करणारे मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षी निमित्त शासनाने विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांनी गायलेल्या गीतांचा संग्रह नवीन पिढीला उपलब्ध करून द्यावा व संगीत प्रेमी संगीत कलाकार गीतकार रफी यांना आदरांजली देण्यात यावी अशी मागणी सभागृहात भाजपा प्रदेश सरचिटणीस व अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनावर करून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सावरकर यांची मागणीची दखल घेतली घेऊन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून मोहम्मद रफी यांची जन्मभूमी पंजाब असली तरी महाराष्ट्र ही कर्मभूमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जन्मशताब्दी साजरी करेल व विविध कार्यक्रम आयोजित करेल असे अभिवचन दिले.
सविस्तर वृत्त येथे👆 पहा...
आमदार रणधीर सावरकर यांनी गीतकार मोहम्मद रफी यांनी अनेक अमर अजय स्वरबद्ध करून संगीत प्रेमिकांना मंत्रमुग्ध केले होते 52 वर्षीय मोहम्मद रफी यांनी केलेल्या कलासाधनाची प्रचिती नवीन पिढीला व्हावी व त्यांच्या गीताचा संग्रह नवीन पिढीला आस्वाद घेता यावा यासाठी व संगीत कलाकारांना आदरांजली व त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित व्हावा अशी मागणी सभागृहात केली. त्याची व या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी करत केली नामदार देवेंद्र फडणवीस यांनी तत्काल त्याची दखल घेऊन सभागृहामध्ये मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येईल व या संदर्भात सांस्कृतिक विभागाला दिशा निर्देशक देण्यात येईल असे अभिवचन दिले. शेतकरी नेते तसेच विविध विषयावर अभ्यासपूर्ण मागणी करणारे आमदार रणधीर सावरकर यांची कला संगीत व संगीताबद्दल असलेली आवड या निमित्ताने सभागृहाला नवीन आयाम माहिती पडला.
0 टिप्पण्या