आ.मिटकरी यांनी डाॅ. नीलम ताई गोऱ्हे यांना दिले पत्र, चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी
काही दिवसांपूर्वी अकोला शहरात एका चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांची आ. अमोल मिटकरी यांनी भेट घेतली. यावेळी अकोला शहराचे शिवसेना संपर्कप्रमुख संदीप पाटील यांची उपस्थित होते.
यावेळी पिडीत मुलीचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, या खटल्यासाठी जेष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, मुलीचं उच्च दर्जाच्या समुपदेशकाकडून समुपदेशन व्हावं, तिच्या शिक्षणात या संपुर्ण प्रकरणामुळे जो खंड पडला आहे, तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तिचं शैक्षणिक पालकत्व सरकारने घ्यावं, मुलीचं संपुर्ण पुनर्वसन केलं जावं. या संपुर्ण प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचार्यांवर कारवाई व्हावी, अकोल्यातील इतर लैंगिक छळवणूक प्रकरणात पोलीस कारवाईचं मुल्यमापन करावं, आदी मागणीचे आ. अमोल मिटकरी यांनी डाॅ. नीलम ताई गोऱ्हे यांना पत्र दिले. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रामुख्याने हा मुद्दा विधिमंडळात मांडण्यास मा.सभापतींनी सहमती दिली.
0 टिप्पण्या