Ticker

6/recent/ticker-posts

स्व. गोवर्धन शर्मा हे विचारांशी निष्ठा जपणारे नेते -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

स्व. गोवर्धन शर्मा हे विचारांशी निष्ठा जपणारे नेते -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील


अकोला : आमदार स्व. गोवर्धन शर्मा हे पक्ष व संघटनेच्या विचारांप्रती आयुष्यभर बांधीलकी आणि निष्ठा जपणारे नेते होते, अशा शब्दांत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार स्व. शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी अकोला येथील आमदार स्व. गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी स्व. शर्मा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मंत्री श्री. पाटील यांनी स्व. शर्मा यांचे कुटुंबिय श्रीमती गंगादेवी शर्मा, कृष्णा शर्मा, अनुप शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.
           
              मंत्री चंद्रकांतदादा पाटील




  मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, स्व. शर्मा यांनी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द अनुभवली. मी विद्यार्थी परिषदेचे कार्य करत असल्यापासून माझा स्व. गोवर्धन शर्मा यांच्याशी स्नेह होता. पक्ष व संघटनेच्या विचाराप्रती त्यांनी बांधीलकी आणि निष्ठा जपली. त्यांनी जनसामान्यांत मिसळून त्यांच्या अडचणी सोडविल्या. आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 
अकोला विद्यापीठ उपकेंद्र देण्यात यावे, विदेशी शिकवण्याचा केंद्र यावे जेणेकरून युवकांना रोजगार मिळेल व परदेशी चलन अकोल्यातील अकोला जिल्हा हा शैक्षणिक हे असल्यामुळे पश्चिम विदर्भ हा महत्त्वाचा केंद्र असल्यामुळे दिवशी बनवून भाषांतर कर दुभाषिक केंद्र करण्यात यावे अनेक दिवसाची ही मागणी पूर्तता करण्यात यावी आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे उच्च शिक्षण संसदीय मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली चंद्रकांत दादा पाटील आमदार गोवर्धन शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज राजेश्वर नगरीमध्ये आले होते त्यांनी आज शेतकरी नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे यांच्याशी दिलखुलास चर्चा करून राजकीय सध्याची परिस्थिती सामाजिक आर्थिक विषयावर चर्चा विनिमय केला त्यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली यावेळी सौभाग्यवती सुहासिनीताई धोत्रे, अनुप धोत्रे समीक्षा धोत्रे रणधीर सावरकर डॉक्टर रणजीत सपकाळ उपस्थित होते.


 आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे मंडळ व ग्रामीण शहरी भागातील कार्यकर्ते नगरसेवक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार प्रकाश भारताकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल जयंत मसने किशोर पाटील अनुप धोत्रे कृष्णा शर्मा संतोष पांडे गणेश अंधारे देवेंद्र देवर निलेश निनोरे दिलीप मिश्रा राजेंद्र गिरी प्रशांत आवचार संदीप गावंडे मिलिंद राऊत अनिल नावकर राहुल देशमुख राजेश बेले माधव मानकर गणेश तायडे किशोर कुचके संजय गोटेफोडे डॉक्टर शंकरराव वाकोडे एडवोकेट देवाशिष काकड हरीश आलम चंदाने सिद्धार्थ शर्मा, अजय शर्मा, व्यंकट ढोरे अक्षय जोशी मोहन पारधी दीप मनवानी प्रकाश धोगलीया, प्रकाश रेड्डी, शाम विंचनकर विलास शेळके सतीश ढगे विनोद मापारी, पवन महाले विवेक भरणे आधी. होते. यावेळी आमदार सावरकर यांनी अनेक विषयावर यावेळी दिलखुलास दोन तास कार्यकर्त्यांची त्यांनी चर्चा केली सगळ्यांचा परिचय जाणून घेतला. ती राजकीय परिस्थिती व महाराष्ट्राच्या परिस्थितीवर कार्यकर्त्यांचे मनो मत त्यांनी जाणून घेतले. यावेळी आमदार सावरकर सौभाग्यवती मंजुषाताई सावरकर प्रवीण सावरकर आदित्य सावरकर, प्रल्हादराव सावरकर हर्ष सावरकर अनुप धोत्रे यांनी भेटवस्तू देऊन स्वागत केले. त्याच्या पीक परिस्थितीवर सुद्धा त्यांनी चर्चा केली.

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या