Ticker

6/recent/ticker-posts

दोन गटात तणावपूर्ण शांतता, दोषींवर कारवाई करण्याचे पालक मंत्र्यांचे आदेश

दोन गटात तणावपूर्ण शांतता, दोषींवर कारवाई करण्याचे पालक मंत्र्यांचे आदेश

अकोला - अकोट फैलच्या घटनेची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे.  भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या मार्फत त्यांनी आज अकोट फैल येथे दोन गटांमध्ये झालेली दगडफेक व त्यानंतरची परिस्थिती पूर्ण माहिती घेऊ पोलीस प्रशासनाला शांतता ठेवून दोषींवर कारवाई करण्याची आदेश दिले आहेत.  अकोला शहराची व जिल्ह्याची शांतता रहावी याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी तसेच जिल्ह्यातील सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी अकोला शहराची संस्कृती व जिल्ह्याची संस्कृती कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. आमदार सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल किशोर पाटील जयंत मसने यांच्याशी पालकमंत्र्यांनी संवाद साधला तसेच जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाची संपर्कात नामदार विखे पाटील आहे. चेस अल्पवयीन मुली सोबत झालेल्या प्रकरणाची सुद्धा माहिती पालकमंत्री नामदार विखे पाटील यांनी घेऊन दोषीवर सक्त कारवाई करण्याची निर्देश दिले आहे




प्राप्त माहितीनुसार 20 नोव्हेंबर सायंकाळी साडेआठच्या सुमारास आपसी वादातून दगडफेक करण्यात आली. दगडफेकीची माहिती मिळताच अकोट फैल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणली. घटनेची माहिती वरिष्ठांना देताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक एस. पी. अभय डोंगरे. एस. डी. पी. ओ. सुभाष दुधगावकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दोषी विरुद्ध गुन्हे दाखल करणाऱ्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अकोट फैल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू हे करीत आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या