अकोल्यात प्रथमच महाराष्ट्र योग संमेलन व राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन
अकोला - बृहन महाराष्ट्र योग परिषद, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती संचालित भारतीय ज्ञान परंपरा केंद्र महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन, डा.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला, अकोला जिल्हा योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अकोल्यात प्रथमच 15 वे महाराष्ट्र योग संमेलन व 40 वी राज्यस्तरीय योगासन स्पर्धा 25 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीत पंजाबराव कृषि विद्यापीठ येथील पदवीदान सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या मध्ये विविध वयोगटातील मुले, मुली, स्त्री, पुरूष भाग घेणार आहेत. तसेच भारतातील नामवंत योगतज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे 👆 स्पर्श करा
या कार्यक्रमाचे उद्घाटन 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आमदार बसंत खंडेलवाल यांच्या हस्ते व माजी आमदार गजानन दाळू गुरूजी यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, आ. अमोल मिटकरी, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे हे राहणार आहेत. तसेच पीकेवी कार्यकारिणी सदस्य विठ्ठल सरप यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. स्वागताध्यक्ष बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोलाचे अध्यक्ष एड. मोतिसिंह मोहता राहणार आहेत. बीज व्याख्यान डा. मन्मत घरोटे (अध्यक्ष, योग संस्था लोणावळा) यांचे राहणार आहे. या तिन दिवसीय कार्यक्रमात 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 10.30 पर्यंत पंजीकरण, 11 वाजता उद्घाटन व बीज व्याख्यान, दुपारी 3 ते 6 स्पर्धा, व्याख्यान व परिसंवाद, रात्री 9 ते11 सांस्कृतिक कार्यक्रम, दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 8 प्राणायाम, ध्यान व शुध्दीक्रिया प्रदर्शन, 9 ते 1 स्पर्धा व व्याख्यान, 2 ते 3 वार्षिक सभा, 3 ते 6 स्पर्धा व व्याख्यान, रात्री 9 ते 11 सांस्कृतिक कार्यक्रम, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 8 प्राणायाम, ध्यान व शुध्दीक्रिया प्रदर्शन, 9 ते 11 स्पर्धा व व्याख्यान, 11 ते 11.30 वाजता खुले अधिवेशन, 11.30 ते 12.30 समारोप व बक्षिस वितरण असे कार्यक्रम राहणार आहेत. योग मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय योगतज्ज्ञ डॉ. मन्मत घरोटे, डॉ. अविनाश सावजी, डॉ.गणेश शंकरगिरी, डॉ. मधुसूदन पन्ना, डॉ. सुरेश भांडारकर, डा. पी.आर. राजपूत, निसर्गोपचार तज्ञ डा. सुनील लबडे हे राहणार आहेत.
27 नोंव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता समारोप व बक्षिस वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पीकेवीचे कुलगुरू एस. आर. गडाख, प्रमुख पाहुणे, गोपाल खंडेलवाल, पीकेवीचे सुधीर राठोड, दिलीप गोयनका, विशेष उपस्थिती प्राचार्य डा. आर. डी. सिकची, प्राचार्य गजानन चोपडे, प्राचार्य डा. अंबादास कुलट, प्राचार्य जे. एस. साबु, डा. शिरीष थोरात, डा. रणजित सपकाळ, डा. अविनाश पाटील, डा. प्रकाश नागरे, डा. संजय कोकाटे हे राहणार आहेत. या कार्यक्रमाचे विनित बृहन महाराष्ट्र योग परिषदेचे अध्यक्ष डा. संजय मालपानी, कार्याध्यक्ष प्रकाश मासुरकर, सरकार्यवाह प्राचार्य डा.अरूण खोडस्कर, सह सरकार्यवाह सतीश मोहगांवकर, कोषाध्यक्ष प्रा. शशिकांत येवतकर हे आहेत. तरी योग प्रेमींनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष सुधाकर राउत, सचिव अरविंद जोध, प्रा. डा. नानासाहब सपकाळ (आ.स.अध्यक्ष), प्राचार्य देवेंद्र गावंडे, डा. संजय कोकाटे, डा. वशिष्ट खोडस्कर, प्रा.संदीप मांडले, प्रभाकर रूमाले, चंद्रकांत अवचार, अरूण धनोकार, मनीषा कुलकर्णी, गोपाल अग्रवाल, डा.आशिष तिवारी, श्रध्दा मोकाशी, मनिषा नाईक, एड. सारिका तिवारी, अर्जुन हिंगमीरे, प्रा.प्रदीप थोरात, प्र. प. भडंग, सुभाष तायडे, दीपक लुंगे, किशोर गावंडे, आनंद थत्ते, सोलन थत्ते, श्रीधर मेतकर, हर्ष गोयनका समेत सर्व सदस्यांनी केले आहे.
0 टिप्पण्या