Ticker

6/recent/ticker-posts

माणुसकी चा परीचय देणाऱ्या प्रकाश आगे यांचा सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार

माणुसकी चा परीचय देणाऱ्या प्रकाश आगे यांचा सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार


प्रतिनिधी 

अकोला - बार्शीटाकळी : सारकिन्ही गावात ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश विठ्ठलराव आगे २००१ पासून नियमित पाणीपुरवठा करतो. पोळ्याच्या दिवशी त्यांच्या पायांला गंभीर दुखापत झाली पायाला तीन जागेवर फॅक्चर झाले मात्र तरीही पाणीपुरवठा करण्याचे त्यांचे काम अखंडपणे सुरू आहे. पायाला दुखापत झाल्यावरही जीवाची पर्वा न करता गावकऱ्यांना रात्री बे रात्री टू व्हीलर गाडीवर बसून प्रत्येक वार्डामध्ये प्रकाश आगे सुरळीत पाणीपुरवठा करतात. विज पुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्रामीण भागात पाणीपुरवठा कधी होईल याची निश्चिती नसते.


 परंतु सारकिन्ही गावात गावकऱ्यांसाठी प्रकाश आगे रात्रभर जागत घरोघरी पाणी मिळावे यासाठी स्वतच्या जीवाचा आटापिटा करतो त्यामूळे त्यांचें सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा कर्मचारी टाळाटाळ करतात. परंतु सारकिन्ही गावात मात्र प्रकाश विठ्ठल आगे या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी कर्तव्य व माणुसकीचा परिचय आपल्या कार्यातुन दिला आहे.


माणुसकी चा परीचय देणाऱ्या प्रकाश आगे यांच्या कामाचे कौतुक व्हावे या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे व सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे यांनी त्यांच्या गावात जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे, सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे, राजेश गायकवाड ,कमाल भाई आदि कार्यकर्ते उपस्थित होते.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या