विधी व सेवा न्यायाधिकरण अकोला द्वारे विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
विधी व सेवा न्यायाधिकरण अकोला व न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय,अकोला यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी लोकमान्य टिळक सभागृहात वर्ग 9ते12 वर्गातील विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मुख्यत: सायबर क्राईम व सोशल मीडियाचा वापर त्या अनुषंगिक होणारे विविध प्रकारचे गुन्हे,बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार व आपली नैतिक जबाबदारी व कर्तव्ये या विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती एस एस बांगर ,मुख्य न्याय दंडाधिकारी, अकोला जिल्हा न्यायालय ह्या होत्या,त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
श्री एन एन उंबरकर, मुख्य लोक अभिरक्षक ,अकोला न्यायालय यांनी विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी व कशाप्रकारे विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी मुलींच्या संदर्भात कोणत्या प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन केले.
श्री विजय नाफडे, पोलीस निरिक्षक सायबर विभाग यांनी सायबर क्राईम याविषयी मार्गदर्शन केले त्याचबरोबर त्यांचे सहकारी श्री केदार यांनी त्यासंदर्भात अतिशय बारकाईने कोणत्या प्रकारे गुन्हे होतात आपण कोणती दक्षता घ्यावी या संदर्भात माहिती दिली यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री माधव मुनशी हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.आरती मुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. श्री काजळे यांनी केले यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. विज्ञान रेलकर तसेच प्रभारी प्रा. अमोल बुटे प्रा.श्रीकांत रत्नपारखी,प्रा.उदय कोल्हेकर यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या