Ticker

6/recent/ticker-posts

'एक तारीख एक तास' स्वच्छता अभियानाद्वारे सर्वांनीस्वत:वर स्वच्छतेचा संस्कार करून घेणे देशासाठी हितावह !

“एक तारीख, एक तास" कार्यक्रमानुसार संत गाडगे बाबाच्या कर्मभूमीत श्रमदान करून स्वच्छता अभियान शुरू


'एक तारीख एक तास' स्वच्छता अभियानाद्वारे सर्वांनीस्वत:वर स्वच्छतेचा संस्कार करून घेणे देशासाठी हितावह !


संतोष माने मुर्तीजापुर प्रतिनिधी:

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या एक दिवस अगोदर म्हणजे 'एक तारीख, एक तास' या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातच्या १०५ व्या भागात पंतप्रधानांनी १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास श्रमदान करण्याचे आवाहन केले होते.त्यास प्रतिसाद देत मुर्तीजापुर तालुका वासियांनी शहर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.


         .मुर्तीजापुर रेल्वे जंक्शन परिसरात स्वच्छता पंधरवाडा निमित्त रेल्वे विभाग व मुर्तीजापुर स्वच्छता अभियान मुर्तीजापुर, श्री.गाडगेबाबा एनसीसी पथक, भा.ज.पा. तसेच नगर परिषद व पतंजली व नेहरू युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी दहा वाजतापासूनच स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. गेल्या आठ वर्षापासून महान संत निष्काम कर्मयोगी श्री.गाडगेबाबा यांच्या संदेशाचे पालन करत मुर्तीजापुर स्वच्छता अभियान मुर्तीजापुर निस्वार्थ भावनेने स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचे कार्य पार पाडत आहेत.रेल्वे स्टेशनसह परिसर तसेच शकुंतला नँरोगेज परीसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येऊन श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. तसेच प्रवाशांना स्वच्छता राखण्यासाठी स्टेशन प्रबंधक तेजकुमार सवाई यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छता अभियानाला मुर्तीजापुर व बार्शीटाकळी या संयुक्त मतदार संघाचे आमदार हरीश मारोतीआप्पा पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती व सक्रिय सहभाग होता. मुर्तिजापूर स्वच्छता अभियानाचे जेष्ठ मार्गदर्शक प्राचार्य सत्यनारायण तिवारी,नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे,माजी नगराध्यक्षा मोनाली गावंडे,तिकीट क्लर्क मिलींद पठाडे,केतन चिंचमलातपूरे,रावसाहेब कांबे, सतीशचंद्र शर्मा,अतुल सूर्यवंशी,रितेश सबाजकर, स्वच्छता अभियानाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सत्यनारायण तिवारी, विलास नसले,रोहित सोळंके, दिनेश श्रीवास,सुरेंद्र भेलोंडे, अविनाश बांबल सर,विनोद देवके सर,विलास वानखडे,गजानन वरघट सर, रवी गौडचर सर,नितीन परांजपे,विठ्ठल काकोडे,सुनील वानखडे,माजी मुख्याध्यापक भड काका,दीपक खंडारे,दिगंबर सदार,अली सर,सुनिल मालखेडे,बबलू भेलोंडे, इम्रानभाई,तर नगर परिषद माजी उपाध्यक्ष सचिन देशमुख,माजी नगरसेवक भारत जेठवाणी,अजय प्रभे,अभय पांडे,सुधिर दुबे,श्री.गाडगेबाबा एन.सी.सी. कैडेट्सचे विद्यार्थी,रेल्वे कर्मचारी, आर.पी.एफ., नगर परिषद कर्मचारी,पतंजली,नेहरू युवा मंडळ आदींचा सहभाग होता.


तसेच मुर्तिजापूर बस स्थानकावर देखील आगार व्यवस्थापक हेमंत चांदुरकर यांच्या उपस्थितीत मुर्तीजापुर स्वच्छता अभियान मुर्तीजापुरच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात  आले.तर शहरात विविध शासकीय विभाग, शाळा आणि संघटनांनी देखील स्वच्छता अभियान राबविले. स्वच्छता ही सेवा कार्यक्रम अंतर्गत १ तास स्वच्छतेसाठी अंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविल्या गेली.कोकणवाडी, आठवडी  बाजार, लकडगंज परिसरातील स्वच्छता मोहीम उपविभागीय अधिकारी संदिप अपार तसेच तहसीलदार शिल्पा बोबडे, व महसूल कर्मचारी, प्रशासक दत्ता मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे व नगरपरिषद कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शवून सर्वांनी श्रमदान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ ऑक्टोबरला कचरामुक्तीसाठी श्रमदान अभियान राबविण्याची सूचना केली होती. त्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यभरात करण्यात आली. रविवारी सकाळपासूनच ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानात मुर्तीजापुर शहरात विविध उपक्रम राबविले जात आहे.त्यास उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. एक तारीख एक तास स्वच्छतेसाठी अंतर्गत सर्वांनी श्रमदान केल्याचे नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांनी सांगितले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या