स्व. सौ. आईसाहेब खेंडकर स्मृर्ती दिन खेंडकर ज्ञानगंगेत संपन्न
अकोला:
१ ऑक्टोबर स्व. सौ. आईसाहेब उपाख्य मायाताई खेंडकर यांचा स्मृर्तीदिन, सरस्वती नगर, जुना वाशीम नाका, बायपास, अकोला येथील विष्णुपंत खेंडकर माध्यमीक विद्यालय, स्व. यमुनाबाई खेंडकर मराठी प्रा. शाळा व स्व. नारायणराव खेंडकर काॅन्व्हेट येथे संपन्न झाला. दरवर्षी हा कार्यक्रम विविध अशा बहुरंगी कार्यक्रमातुन विद्यार्थांच्या समवेत साजरा होतो. या वर्षीसुध्दा विविध स्पर्धांचे आयोजन करून कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्व. आईसाहेब खेंडकर यांच्या पावन स्मुर्तीस अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश संयोजक भाजपा शिक्षक आघाडी चे राज्याध्यक्ष डॉक्टर प्रशम कोल्हे, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर, कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनीष गावंडे, तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक यांनी आपल्या भाषणातून "कालेय तस्मे नमः" म्हणजेच काळ हा कुणासाठी थांबत नसतो परंतु आपल्या समोर असलेला काळाचा व वेळेचा सदुपयोग घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करत रहावी, असे प्रतिपादन केले.
डॉक्टर प्रशम कोल्हे, राज्याध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश संयोजक भाजपा शिक्षक आघाडी
यावर्षी स्मृतिदिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये कॉन्व्हेंट विभागात रंगभरण स्पर्धा, स्मरणशक्ती व चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आले. तर वर्ग पहिली व दुसरी साठी रंगभरण स्पर्धा व वाटर कॉइन, वर्ग तिसरी व चौथीसाठी लिंबू चमचा स्पर्धा व रंगभरण स्पर्धा, तसेच वर्ग पाचवी ते सातवी साठी चित्रकला व बैलपोळा सणावर निबंध स्पर्धा आणि आठवी ते दहावी साठी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेमध्ये वृक्षसंवर्धन विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी भरगच्च असा आपला सहभाग नोंदविला होति. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी दर वर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेला स्नेह भेट दिली. कार्यक्रमाचे संचालन उषा उबाळे यांनी केले. तर आभार सुरेश सुरत्ने यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्या साठी शाळेतील शिक्षक आशा हिवरकर, प्रज्ञानंद थोरात, श्रीकांत पागृत व गोपाल वानखडे, कांचन वानखडे, मनीषा अंभोरे, सुरेश सुरत्ने, प्रशांत काळे, अश्विनी सोळंके, पल्लवी हिंगणकर, शितल तिवारी, अंजु मुंढे, यामीनी उपश्याम, उन्हाळे मॅडम, शारदा पांडे, कांचन तायडे जया तेलगोटे, संचीता भालतीलक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होता.
0 टिप्पण्या