Ticker

6/recent/ticker-posts

बाजोरीया विद्यालयाच्या प्रांगणात रंगणार भव्य गरबा महोत्सव

बाजोरीया विद्यालयाच्या प्रांगणात रंगणार भव्य गरबा महोत्सव


श्री गुजराती नवरात्री महोत्सव समितीच्या वतीने महानगरातील मुंगीलाल रविवार १५ ते २२ ऑक्टोबर कालावधीत विद्यालयाच्या प्रांगणात गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला असून वर्ष आहे. यावर्षीही या गरबा महोत्सवाचे हे एकोणवीसावे महोत्सवात नागरिकांसाठी गुजराती विश्वाची अस्सल लोकधारा गरब्याच्या रूपाने बघावयास मिळणार असल्याची माहिती मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात शुक्रवारी आयोजित गरबा महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत समितीचे सचिव हरीश लाखानी यांनी दिली. 


भव्य स्टेजवर राज्यात पारंपरिक गरबा संगीत व गीत गाणारी अनुभवी अरुण मोदी व श्वेता मोदींची संगीत टीम बेंजो व ढोलकीच्या पारंपरिक वाद्यांवर संगीत उधळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या गरबा महोत्सवात घट स्थापना, दैनिक चंडीपाठ, दैनिक आरती, पूजन करण्यात येणार असून अष्टमीला प्रांगणात होम हवन करून शुचिर्भूतता निर्माण करण्यात येणार आहे.

यावेळी पुरुष गरबा प्रेमी साठी गरबा खेळण्याची आहे. विशेष व्यवस्था प्रांगणात करण्यात आली आहे. पुरुष आणि महिला यांनी भारतीय पारंपरिक पेहरावतच प्रांगणात गरबा खेळून भारतीय संस्कृती व सभ्यता जपावी तसेच युवावर्गानेही मातृशक्तीच्या या जागरण महोत्सवात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेत समितीला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. गरबा महोत्सवात मातृशक्तीची सुरक्षितता व आसन व्यवस्था संदर्भात समितीने चोख व्यवस्था निर्माण केली असून पुरुष वर्गासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था राहणार

तसेच प्रवेश हा पासेस द्वारेच देण्यात येणार आहे. प्रांगणात सीसीटीवी व महिला गार्डची व्यवस्था राहणार आहे. उत्तम विद्युत व ध्वनी व्यवस्था हे या महोत्सवाचे खास आकर्षण राहणार आहे. महोत्सव चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी प्रशासनाच्या सूचना व निर्देशांचे वेळोवेळी पालन करण्यात येणार आहे. गरब्यात यावर्षीही भरपूर व आकर्षक देण्यात येणार आहेत. तसेच उत्तम गरबा खेळणाऱ्या महिला-मुलीस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. घट स्थापना दिनी सायंकाळी मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात मान्यवरांच्या या गरबा महोत्सवाच्या उपस्थितीत आयोजित उदघाटन सोहळ्यास व नित्य गरबा बघण्यास नागरिक महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. समितीचे अध्यक्ष वालजी पटेल, हेमेन्द्र राजगुरू, मनोज भीमजियानी, दिनूभाई सोनी, आशीष वखारीया, अरविंद पटेल, कपिल ठक्कर, प्रकाश लोढिया, शीतल रुपारेल, अनिषा वखारिया, नीलिमा वोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या