Ticker

6/recent/ticker-posts

सम्यक विद्यार्थी यांच्या वातिने  "भव्य इशारा मोर्चा" 

सम्यक विद्यार्थी यांच्या वातिने  "भव्य इशारा मोर्चा" 


नोकर भरतीचे खाजगीकरण, पेपरफुटी विरुद्ध कायदा, जादा परीक्षा शुल्क, शिक्षक भरती, कंत्राटी शिक्षक, शाळा खाजगकरण व शाळा दत्तक, समुह शाळा ह्या विरोधात अकोल्यातील तरुणाईचा निघणार एल्गार. सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हाच्या च्या वातिने  "भव्य इशारा मोर्चा" आज शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आला. अकोला शास्त्री स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत १८ ऑक्टोबर २०२३, सकाळी १० वा. सम्यक आंदोलन प्रमुख  प्रा. अंजलीताई आंबेडकर, ह्यांचे नेतृत्त्वात "भव्य इशारा मोर्चा" आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कंत्राटी नोकर भरती शासन निर्णय तात्काळ रद्द करावा व सरकारी क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करण्यात यावे. वाढीव फी रद्द करण्यात यावी. पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करण्यात यावा. त्यात अजामीनपात्र व राज्याचे विरुद्ध द्रोह केल्याचे कलम समाविष्ट करावे, सरकारने केलेले जाचक नियम रद्द करून आपल्या भवितव्य आणि शिक्षण अधिकार अबाधित ठेवण्यासाठी सुशिक्षित तरुण तरुणी, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, शिक्षक पालक, संस्था चालक व संघटना ह्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
             जिल्हाध्यक्ष -धीरज इंगळे

मोर्चा मधे प्रमुख उपस्थिती राजेंद्र पातोडे,युवा प्रदेश महासचिव, प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष  अरुंधती शिरसाट,प्रदेश महासचिव बालमुकुंद भिरड, विभागीय महासचिव यांचा सहभाग असणार आहे. सदर आंदोलन सम्यक विद्यार्थी जिल्हाध्यक्ष इंजिनियर धीरज इंगळे, श्रीकांत घोगरे,गायत्री ढाके जिल्हा महासचिव प्रमुख अक्षय डोंगरे अंकित इंगळे राहुल खाडे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या