महानगरात महाराष्ट्र कॉटन ब्रोकर्स असो.च्या राष्ट्रीय स्वर्ण जयंतीचे आयोजन
राष्ट्रीय संमेलनासाठी भारतातील सर्व स्पिनिंग,जिनिंग, फार्मर व ब्रोकर संघटनांचे सहकार्य
अकोला-भारतभरातील कापूस व्यवहारांचे कामकाज करणाऱ्या दी महाराष्ट्र कॉटन ब्रोकर्स असो.च्या वतीने महानगरात असो.चे दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनात असो.ची सुवर्ण जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊन यात देशभरातील कापूस विषयाशी संबंधित असो.संस्था, शेतकरी व संघटनांचा सहभाग राहणार आहे. कापूस उत्पादक शेतकरी व कापूस व्यवहार करणारा वर्ग यामध्ये सुरेख संगम साधण्यासाठी हे राष्ट्रीय संमेलन होत असल्याची माहिती दी महाराष्ट्र कॉटन ब्रोकर्स असो.च्या वतीने होत असलेल्या महाराष्ट्र कॉटन कॉन्फरन्स 2023 चे चेअरमन राजकुमार रुंगटा यांनी दिली.
आरजी सभागृहात रविवारी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत यावेळी महाराष्ट्र कॉटन ब्रोकर्स असो.चे अध्यक्ष सचिन शर्मा, असो.चे सल्लागार दिनू सुरसे, चंद्रकुमार मोहता, असो.चे कोषाध्यक्ष संतोष राठी, सहसचिव विकास तिवारी आदी पदाधिकारी उपस्थित होते. महानगरातील हॉटेल जलसा सभागृहात आगामी दिनांक 9 व 10 सप्टेंबर रोजी हे राष्ट्रीय संमेलन होत असून यात केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, केंद्रीय टेक्स्टाईल मंत्री पियुषजी गोयल,केंद्रीय उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाशजी, केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्रजी तोमर, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,राज्याचे कृषिमंत्री धनंजयजी मुंडे समवेत भारतभरातील कापूस उत्पादक व ब्रोकर्स असो.संस्थाचे अध्यक्ष आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.आजमीतीस जगभरात कॉटन इंडस्ट्री मोठ्या जोमाने फोफावत असून महाराष्ट्र हा प्रमुख कापूस उत्पादक प्रदेश असून येथे कॉटन इंडस्ट्रीज, जिनिंग, प्रेसिंग, स्पिनिंग, ट्रेडर्स, एक्सपोर्टर, ब्रोकर आदी मोठा वर्ग असून हा कापूस विश्वाला विकसित करीत आलेला आहे. या वर्गात आपसात सुसंवाद घडावा व सामूहिक प्रयत्नाने या क्षेत्राचे सबलीकरण व्हावे, नवे तंत्रज्ञान व कृषि माहिती कापूस उत्पादक व ब्रोकर यांना व्हावी, त्यांच्यात सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी हे आयोजन होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले या राष्ट्रीय संमेलनात येणाऱ्या पाच वर्षासाठी कापूस संदर्भात रुपरेखा व दिशा निर्देश निश्चित करण्यासाठी हे आयोजन होत असल्याचे रुंगटा यानी याची गाईडलाईन या राष्ट्रीय संमेलनात करण्यात येणार आहे. संमेलनात अनेक राज्यातील कर्तबगार कास्तकार, कापूस संशोधक, एमसीएक्सचे तज्ञ ,उद्योजक, व्यापारी तज्ञांचे अनेक व्याख्यानांचे सत्र होणार आहेत.
दिनांक 9 सप्टेंबर रोजी ग्रँड जलसा येथे सकाळी या राष्ट्रीय संमेलनाचा रंगारंग स्वर्ण जयंती व उद्घाटन सोहळा होणार आहे. यात कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाईल इंडस्ट्रीजच्या महासचिव चंद्रमा चटर्जी, साउथ इंडिया मिल असो.चे महासचिव डॉ सेलवा राजू, डॉ सीडी मायी, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरदचंद्र गडाख, कॉटन असो. ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा, वर्धमान टेक्सटाईल लुधियानाचे संचालक सुशील जाम,निजीविडू बियाणे कंपनीचे अध्यक्ष प्रभाकरराव, इंडियन कॉटन असो.चे माजी अध्यक्ष राकेश राठी, इंडियन कॉटन असो.चे अध्यक्ष मुकुल तायल, तेलंगणा कॉटन असो.चे अध्यक्ष रवींद्र रेड्डी,अ. भा. फार्मर प्रोडूसर ऑर्ग.चे अध्यक्ष मनीष डागा समवेत अनेक तज्ञ या राष्ट्रीय संमेलनात उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भारतभरातून येणाऱ्या मान्यवरांची आवास निवास व्यवस्था असो.च्या वतीने करण्यात आली असून राष्ट्रीय संमेलनाच्या द्वितीय दिनी दिनांक 10 सप्टेंबर रोजी संमेलनात उद्योग, व्यापार आदी विषयावर राष्ट्रीय तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. तसेच एमसीएक्सचे तज्ञ,सफल कास्तकार, संशोधक यांची तांत्रिक व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलनात गुजरात ट्रेड असो. स्पिनर असो, इंडियन कॉटन फेडरेशन, इंडियन कॉटन असो लिमि. महाराष्ट्र कॉटन जीनर असो., आंध्र प्रदेश टेक्सटाईल मिल असो., मध्यांचल कॉटन अँड ट्रेडर्स असो.,कॉटन असो. ऑफ इंडिया, नॉर्दन इंडिया टेक्स्टाईल मिल असो. सीमा कॉटन डेव्हलपमेंट अँड रिसर्च असो. कोईमतुर कॉटन असो. नॅशनल कॉटन ब्रोकर असो. ऑफ इंडिया, कर्नाटका कॉटन असो. समवेत भारतभरातील बहुसंख्य कॉटन ब्रोकर फार्मर्स बियाणे उत्पादक असोसिएशन आदींचे सहकार्य लाभत असून विदर्भातील समस्त कापूस उत्पादक ब्रोकर व सलग्न संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या दोन दिवसीय संमेलनाच्या सफलतेसाठी महाराष्ट्र कॉटन ब्रोकर असो.चे समस्त पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहेत.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या