Ticker

6/recent/ticker-posts

बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा

बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा


ओबीसी आरक्षण बैठकीत अनिल शिंदे यांनी केली मागणी


अकोला/ राज्यांत मराठा आरक्षणावर सगळीकडून राजकारण सूरू आहे. त्याच आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला आहे. जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला बसून सरकारच्या नाकी नऊ आणले आहे. त्यामुळे त्या समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाणे घेउन ओबीसी एकवटले त्यामुळे सरकारने त्यांना बैठकीला बोलावून त्यांना विश्वास दिला की ओबीसी आरक्षणला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले जाईल. यासाठी बोलाविलेल्या बैठकीत बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा अशी मागणी धोबी समाज आरक्षण कृती समितीचे कार्याध्यक्ष तथा बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष अनिल शिंदे यांनी बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा अशी मागणी ओबीसी बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व समाज कल्याण मंत्री व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत केली आहे.


यावेळी माजी आमदार तथा ओबीसी जनमोर्चा प्रदेशाध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार,उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व ओबीसी नेते छगन भुजबळ, ओबीसी मंत्री अतुल साबे, माजी मंत्री संजय कुटे, प्रकाश उके, आम् गोपीचंद पडळकर, खास.रामदास तडस, सुधीर मुनंगटीवार,जनमोर्चा प्रदेश ऊपाध्यक्ष अनिल शिंदे उपस्थीत होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी लवकरच या साठी स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या