महानगरात छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन
2 ऑक्टोंबर रोजी महानगरात निघणार विविध झाकी व देखावे समवेत विराट शौर्य जागरण यात्रा
अकोला- समाजाला देशाच्या सांस्कृतिक ऐतिहासिक व पारंपारिक बाबीची माहिती होवो त्यांच्यात जाजल्य शौर्य व देश परमाचे भावना जागृत हो समाजाची सुप्त शक्ती जागृत होऊन हिंदू समाजाचे धार्मिक अधिष्ठान सशक्त व बलशाली हो या उदात्त हेतूने विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वा शिवराज्याभिषेक दिनाच्या पावन पर्वावर महानगरात छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन विश्व हिंदु परिषद बजरंग दल अकोला महानगरात करण्यात आले असून या यात्रेत शौर्याचे प्रतीक असणाऱ्या विविध झाक्या व देखावे साकार करण्यात येणार आहेत. महानगरासाठी शौर्याची ही मोठी पर्वणी यानिमित्ताने निर्माण होत असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा समितीचे कार्याध्यक्ष रामप्रकाश मिश्रा यांनी दिली. विहीप बजरंग दल शौर्य जागरण यात्रा समितीच्या वतीने मंगळवारी मिश्रा यांच्या परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत या यात्रेची संपूर्ण माहिती देण्यात आली. विहीप बजरंग दलाच्या वतीने संपूर्ण विदर्भात दिनांक 2 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोंबर पर्यंत शौर्य जागरण पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या पंधरवड्यात अकोला,बुलढाणा, चंद्रपूर, रामटेक, नागपूर, भंडारा,यवतमाळ,अमरावती आदी जिल्ह्यात शौर्य जागरण यात्रा विविध उपक्रमांच्या माध्यमातून या आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
अकोला राजराजेश्वर नगरीत दिनांक 2 ऑक्टोबर रोजी ही शौर्य जनजागरण यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात प्रमुख पाहुणे म्हणून विहीप बजरंग दलाचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे हे उपस्थित राहणार असून परांडे यांच्या उपस्थितीत शौर्य
जागरण यात्रा निघणार आहे. या जागरण यात्रेच्या निमित्ताने परांडे यांच्या व्यापारी, वैद्यकीय वर्ग तथा कार्यकर्त्यांसमवेत विविध सभा आयोजित करण्यात आल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दिनांक ०२ आक्टोंबर रोजी स्थानीय हुतात्मा चौक परिसरातून या जागरण यात्रेचा प्रारंभ मोठ्या स्वरूपात होणार आहे. यामध्ये पुरोहित वर्गाची होमहवन झाकी, देशासाठी शहीद झालेल्या शहिदांच्या वीर पत्नी व वीर मातांची झाकी, शिवकालीन देखावे असणाऱ्या झाक्या, देखावे समवेत हजारो महिला पुरुषांच्या उपस्थितीत ही शौर्य जागरण यात्रा महानगरातील सर्व प्रभागातील (प्रखंड) नागरिकांशी संवाद साधित व भ्रमण करणार आहे. त्यानंतर रात्री खडकी परिसरातून या शौर्य जागरण यात्रेची अकोला ग्रामीण परिसरात जागरण यात्रा साठी ग्रामीण मधील विहीप बजरंग दल यांच्या सुपूर्त करण्यात येणार आहे.या नंतर या यात्रेचा समारोप दि 9 ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे होणार आहे. शौर्याचे प्रतीक असणारी ही भव्य जागरण यात्रा महानगरात प्रथमच आयोजित करण्यात आली असून नागरिक महिला, पुरुषांनी या जागरण यात्रेच्या आगमन प्रसंगी आपापल्या परिसरात तोरणे पताका व रांगोळी काढून यात्रेतील प्रसंगांना ओवाळून त्यांचे जल्लोषात स्वागत करावे व या शौर्य जागरण यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रामप्रकाश मिश्रा यांनी यावेळी केले. ही शौर्य जागरण यात्रा सफल करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा समितीचे कार्याध्यक्ष रामप्रकाश मिश्रा, प्रांत गौरक्षा गौसंवर्धन प्रमुख अतुल आयचीत, प्रांत सहमंत्री-अकोला विभाग पालक अमोल अंधारे, प्रांत सहसंयोजक सुरज भगेवार, विभाग मंत्री संजय रोहनकर, विभाग संयोजक अभिलाष खडके, विभाग समरसता प्रमुख सुरेश कुलकर्णी, विभाग स्वावलंबन भारत संपर्क प्रमुख संतोष वर्मा, जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोढिया, जिल्हा कोषाध्यक्ष, डॉ प्रविण चव्हाण, सहकोषाध्यक्ष आशिष भीमजियानी, अकोला जिल्हा मंत्री सुरेंद्र जयस्वाल, सहमंत्री सुधाकर बावस्कर व निलेश पाठक, संयोजक हरिओम पांडे,सहसंयोजक सागर वाघ व आकाश ठाकरे, जिल्हा समरसता प्रमुख संदीप निकम।समवेत जिल्हा मातृशक्ती संयोजिका सौ रेखाताई नालट, सौ वर्षा दीक्षित, श्रीमती शोभा धवणे, सौ आशा परमार, सौ हर्षा चव्हाण, सौ रोहिणी तपनकर आदी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.

0 टिप्पण्या