Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत महानगरात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन

डॉ.राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत महानगरात भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन


 बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय भंतेची राहणार उपस्थिती


अकोला-दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जागतिक बुद्ध संघटनेच्या सहकार्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न विश्व स्तरावर साकार करण्यासाठी अनेक वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणारे वैचारिक नेतृत्व म्हणून ख्यातनाम व वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टचे आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे अकोला महानगरात प्रथमच आगमन होत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉ.अरुण चक्रनारायण यांनी दिली.
स्थानीय शासकीय विश्रामगृह येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत या एक दिवसीय कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष देवीलाल तायडे, महानगर अध्यक्ष सुनील शिरसाट,महिला अध्यक्ष राजकन्या सावळे, महानगर अध्यक्ष शोभा वानखडे, महानगर उपाध्यक्ष बाळासाहेब अंभोरे, यशवंत इंगोले, डॉ दयाराम तायडे, नंदरत्न खंडारे,सुनील तायडे, विजय कांबळे, जितेंद्र अहिर,राजू मोरे,रमेश वानखडे, गजानन वानखडे आदी उपस्थित होते. महानगरात दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजता गांधी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे एक दिवसीय धम्म मेळावा होत असून  भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ अरुण चक्रनारायण यांच्या अध्यक्षतेत आयोजित या धम्म मेळाव्याचे मार्गदर्शक म्हणून डॉ. राजरत्न आंबेडकर हे राहणार  आहेत. तर धम्म मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील पू. भदंत डॉ.खेमधम्म महाथेरो हे मार्गदर्शन करण्यात आहेत. उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त  उपविभागीय अभियंता सुनील शिरसाठ तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत सम्राट डोंगरदिवे व प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक वैभव  धबडगे, अमरावतीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले, भदंत विजय कीर्ती अकोला,भदंत यश नागसेन मूर्तिजापूर,भदंत विशाल कीर्ती, पु।भदंत आनंद अकोला, भदंत प्रज्ञा बोधि अकोला,भदंत उपाली अकोला, बौद्ध महासभेचे विभागीय अध्यक्ष रमेश अवचार, वाशिमचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र छापाने, बुलढाणा जिल्हाध्यक्ष रामदास घेवंदे, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष सतीश इंगोले, लॉर्ड बुद्ध फाउंडेशन वंदना संघाचे अध्यक्ष इरभान तायडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद वानखडे, उमेश इंगळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या धम्म मेळाव्यात समाजाच्या प्रलंबित धार्मिक,सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय समस्यावर डॉ राजरत्न आंबेडकर हे मार्गदर्शन करणार असून धम्मोपदेश पू. भदंत खेमधम्मो हे करणार आहेत.याशिवाय अन्य वक्ते आपले विचार व्यक्त करून या धम्म मेळाव्यात चैतन्य आणणार आहेत. या धम्म मेळाव्याची जोरदार तयारी भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने जोमाने सुरू करण्यात आली असून या एकदिवसीय भव्य धम्म मेळाव्यात समस्त पुरोगामी, परिवर्तनवादी बौद्ध महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या धम्म मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेत महासभेचे कार्याध्यक्ष देवलाल तायडे यांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अकोला शाखेच्या वतीने आतापर्यंत करण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेत यावेळी अनुराधा अंभोरे, दीपमाला तेलगोटे ,आशा नरवाडे ,मंगला वानखेडे ,वर्षा सोनोने ,अस्मिता रायबोले किरण चक्रनारायण,   गंगा गवई , पुष्पा  शिरसाठ ,रुक्माई शिरसाट महासभेचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या