सुमिरमा फाउंडेशन द्वारा आयोजीत भव्य आरोग्य तपासणी व औषधी वाटप
दिनांक 06 ऑगस्ट 2023 रविवार, तांदळी खु, ता. बाळापूर, जि. अकोला, या गावी काही अश्या वस्त्या आहेत जिथे लोक सर्व गोष्टीपासून नेहमीचं वंचित असतात. त्यांच्याकडे कुठलीच सुविधा नाहीत. विशेष म्हणजे आरोग्य बाबतही त्यांना कुठलीच सुविधा मिळत नाही. याबाबत सुमिरमा फाउंडेशनच्या अध्यक्षांना माहिती मिळाली असता त्यांनी त्या गावात जाऊन तेथील व तसेच गावातील इतरही अगदी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंतची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक ती औषधी वाटप करण्यात आले. यावेळी तांदळी खु. या गावातून शिबिराला भव्य प्रतिसाद लाभला.
या आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वीते करिता सुमिरमा फाउंडेशन च्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.



0 टिप्पण्या