Ticker

6/recent/ticker-posts

ती अफवा... ऐतिहासिक वस्तू नसून खोदकाम करण्याचे मजुराचे साहित्य

ती अफवा... ऐतिहासिक वस्तू नसून खोदकाम करण्याचे मजुराचे साहित्य


अकोला येथील जुने शहरातील किल्ला परिसर पोळा चौकात असलेले एका रस्त्याचे खोदकाम सुरू असताना जुने अवशेष सापडल्याची अफवा पसरल्याने नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. जवळच किल्ला असल्याने जुने शहरात खोदकामात पुरातन अवशेष सापडल्याची माहीती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. पुरातन अवशेष पाहण्यासाठी नागरिकांनी परिसरात गर्दी सुरू केली होती. पुरातन विभाग व जिल्हा प्रशासनाने तपासणी केली असता प्रत्यक्षात रस्त्या खोदकाम करताना कुदळ, फावडे, टोपले सापडल्याचे वास्तव समोर आले आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस, जिल्हा प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी नागरिकांची गर्दी कमी करून या ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासन व अकोला पोलिसांनी केले आहे.





मुख्य संपादक- प्रा.पी.एस.थोरात 
बातमी व जाहीरात साठी संपर्क- 9822674487





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या