Ticker

6/recent/ticker-posts

आरोपीकडून हस्तगत केलेल्या मुद्देमाल परत करण्याची राबवली विशेष मोहीम

आरोपीकडून हस्तगत केलेल्या मुद्देमाल परत करण्याची राबवली विशेष मोहीम


पोलीस अधीक्षक सा. यांचे संकल्पनेतुन अकोला जिल्हा घटकातील पो.स्टे. चे गुन्हयातील आरोपीकडुन हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत विशेष मोहिम राबवुन एकुण १८ लाख ९१ हजार ८७५ रु मुद्देमाल फिर्यादीस सन्मानपुर्वक परत करण्यात आला. 


आज दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ रोजी आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्याबाबत मोहिम राबविण्यात आली असुन सदर मोहिमे दरम्यान एकुण १४ वाहने किंमत ८ लाख ३५ हजार रु, मोबाईल फोन २३ किंमत ३ लाख ४२ हजार ९९४ रु, व सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रक्कम किंमत ५ लाख २१ हजार ८८१ व ईतर मुद्देमाल १ लाख ९२ हजार रू असा एकूण १८ लाख ९१ लाख ८७५रु मुद्देमाल आज रोजी फिर्यादीस सन्मानपुर्वक परत करण्यात आला आहे. तसेच ग्राम निमकर्दा येथिल पोलीस पाटील रामदास शेंडे यांना निमकर्दा बस स्टॉपवर १ लाख सहा हजार रु नगदी रक्कम असलेली बॅग मिळुन आली होती. त्यांनी ती बॅग पोलीस स्टेशन उरळ येथे जमा केली व पोलीसांनी ती कोणाची आहे याबाबत शहानिशा करून सदरची रक्कम ही राहुल शिरसाट शेगाव यांना पोलीस स्टेशन उरळ येथे बोलावुन शहानिशा करून ती रक्कम सुध्दा मुळ मालकास परत केली आहे. पोलीस पाटील यांनी केलेले कौतुकास्पद कार्याची दखल घेवुन त्यांचा पोलीस अधीक्षक यांचे हस्ते योग्य ते बक्षीस देवुन प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. सदर प्रकारची मोहिम राबवुन जास्तीत जास्त जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या