...त्या पुलाच्या कंत्राटदाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
गांधीग्राम नदीवरील चार कोटीच्या पुलाचा व घुसर रोड पेट्रोल पंपाजवळ दर्यापूर वरून येणारा मार्ग बंद झाल्यामुळे त्या कंत्राटदाराची चौकशी करून त्यांचेवर कायदेशिर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे 👆 स्पर्श करा
Byt. एडवोकेट नंदकिशोर जी. शेळके
सरचिटणीस, पश्चिम विदर्भ जनहित कक्ष व विधी विभाग
एडवोकेट किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व एडवोकेट नंदकिशोर शेळके (सरचिटणीस पश्चिम विदर्भ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाच्या व विधी विभाग यांचे नेतृत्वात आज निवेदन दिले की, अकोट मतदार संघातील व परतवाडा, अंजनगांव, दर्यापूर वरून येणाऱ्या प्रवाशांना होत असलेल्या त्रासामुळे त्या रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे. तसेच आधीच अकोट विभागातील जनतेला आधी ग्रांधीग्राम येथील काही दिवस चार कोटीच्या पुलांवरून नंतर अकोला जाण्यासाठी अमरावती जिल्हा क्रॉस करून म्हँसांग मार्गे अति महत्वाच्या कामानिमित्त यावे लागत होते. परंतू अकोला जिल्ह्यातील कंत्राटदार एवढे भ्रष्ट झाले आहे की, त्यांना कोणाच्याही जिवीताचे काहीही किंमत नाही. कंत्राटदाराचा इतका भ्रष्टाचार वाढला की, नवीन रस्ते व पूल १०० टक्के निकृष्ट दर्जाचे बनविले. त्यांचे तात्काळ ऑडीट करून त्यांच्यावर तात्काळ कायदेशिर कारवाई करावी अन्यथा आम्हाला मोठे आंदोलन उभारावे लागेल. असे आवाहन जिल्हाधिकारी यांना करण्यात आले.
एडवोकेट नंदकिशोर जी शेळके, एडवोकेट राजेश पवार जिल्हाध्यक्ष जनहित कक्ष व विधी विभाग, एडवोकेट संतोष गोडे जिल्हाध्यक्ष, एडवोकेट कैलास अनमाने, एडवोकेट सागर जोशी, एडवोकेट प्रकाश पुंडगे, एडवोकेट अनिल कुकडे इत्यादी उपस्थित होते. या बाबतचे निवेदन आज रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस विधी व जनहीत कक्ष एडवोकेट. नंदकिशोर शेळके यांचे नेतृत्वात मनसेचे पदाधिकारी हे निवेदन देत आहे.



0 टिप्पण्या