खुला प्रवर्ग बिंदू नामावली दुरुस्ती करूनच शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करा
अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे 👆 स्पर्श करा
अकोला: राज्य शासनाने नुकताच 30000 शिक्षक भरतीचा निर्णय घेतला परंतु खुल्या व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकांसाठीच्या असलेल्या टक्केवारीच्या प्रमाणापेक्षा फारच कमी जागा या घटकासाठी येत असल्याने बिंदू नामावली दुरुस्ती करूनच शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया पूर्ण करावी असे मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली.
महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार यांचे नेतृत्वात अकोला जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, महानगर अध्यक्ष श्रीकांत सरोदे, महिला जिल्हाध्यक्ष सौ कल्पनाताई बिडवे,सौ रश्मी पटेकर, जिल्हा क्रीडा अध्यक्ष राजेश पाटील, मधुकरराव देशमुख यांच्या एका शिष्टमंडळाने आज निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
निवड प्रवर्ग, नियुक्ती आदेश,जात पडताळणी दप्तरी नसणे,ईडब्ल्यूएस प्रवर्गाची भरती झाली नसताना त्यांच्या बिंदूवर वेगळ्या प्रवर्गाच्या नियुक्त्या,व्हॅलिडीटी नसलेल्या शिक्षकांना खुल्या प्रवर्गात दाखविणे असे अनेक घोळ राज्याच्या अनेक जि. प. व महापालिका शिक्षण विभागात झाल्याचे व खुल्या प्रवर्गावर अन्याय होत असल्याचे निवेदनात निदर्शनास आणून दिले.
त्याचप्रमाणे मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एमपीएससी जाहिरातीत सुधारणा करूनही एसईबीसी ते ईडब्लूएस असा निर्णय घेऊनही 2019 मधील निवड झालेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी तसेच पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रियेतील उमेदवारांच्या नियुक्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे या उमेदवारांवर मोठा अन्याय झाला आहे. मराठा समाजाचे हे प्रश्न शासनाने तातडीने मार्गी न लावल्यास अखिल भारतीय मराठा महासंघ तीव्र आंदोलन छेढेल असा इशारा या निवेदनात देण्यात आला.
यावेळी प्रदीप लुगडे, शंतनू वसू,राजेश देशमुख, काशिनाथ पटेकर,शाम इंगळे, डॉ.नरेश गोंड, डॉ. खेडकर,ऍड. संतोष धोत्रे,ऍड. सुमित इंगळे,मनीषा शिंदे, विनायकराव गावंडे,अरुण खोटरे,सुधीर काहकार,शाम वाफदाने, माधुरी वाघमारे, राखी पटेकर,विनोद गोमाशे,सचिन विधाटे, महादेवराव,श्रीकांत काळमे,बंडू भगत,निलेश सरोदे नानोटे, आरती निकाळजे,सुनीता धवणे सचिन पाटील गोमासे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या