Ticker

6/recent/ticker-posts

सातत्याने पाठपुरावा करून न्यू तापडिया नगर रेल्वे गेटवरील उड्डाणपूल कामाला सुरुवात

सातत्याने पाठपुरावा करून न्यू तापडिया नगर रेल्वे गेटवरील उड्डाणपूल कामाला सुरुवात


अकोला
न्यू तापडिया नगर व उमरी सातव नगर रामदास पेठ तापडिया नगर या भागाला जोडणारा रेल्वे गेटवरील उड्डाणपूल खासदार संजय भाऊ धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या मागणीची दखल घेऊन देशातील विकास पुरुष दळणवळण वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी निधी उपलब्ध करून देऊन कामाला सुरुवात केली परंतु मध्यंतरी रेल्वेची नियम बदलल्यामुळे मध्य रेल्वे दक्षिण मध्य रेल्वे यांच्या दोन रेल्वे लाईन वरील हा पुलाचे काम राज्यातील महाविकास आघाडी च्या काळात निधी नसल्यामुळे काम थांबले होते परंतु महाराष्ट्रात नामदार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेनंतर भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी साडेबावीस कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून आणून उर्वरित रक्कम साडे सत्तावीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची हमी रेल्वे विभागाला दिल्यानंतर नवीन नियमामुळे डिझाईनला वेळ लागला परंतु गेल्या चार दिवसापासून रेल्वे विभागाने काम सुरू केले आहे.


सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून खासदार संजय  धोत्रे आमदार रणधीर भाऊ सावरकर काम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील होते नवीन डिझाईन नकाशा तसेच मंजुरात साठी वेळ लागल्यामुळे व अधिकारी ची बदल्या यामुळे उशीर झाला परंतु आता कामाला सुरुवात झाल्यानंतर केवळ आंदोलनाचा इशारा देऊन पत्रक बाजी करून खोटी प्रसिद्धी मिळवण्याच्या दृष्टीने कामाचा श्रेय काही न करता मिळवण्याचा काही प्रयत्न तथाकथित नेत्यांकडून बसून सर्वसामान्य नागरिकांना गैरसोय लक्षात घेऊन भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकार समस्या निराकरणासाठी प्रयत्नशील असून कामाला गती देण्यात असून संबंधित ठेकेदार याला दीड वर्षाचा कालावधीमध्ये काम पूर्ण करण्याची निर्देश रेल्वे प्रशासनाने दिले आहे.
अधिकाऱ्यांसोबत आमदार रणधीर सावरकर यांनी एक महिन्यापूर्वी बैठक घेतली होती त्याची फळ श्रुती म्हणून कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नाटक बात पासून प्रभाग तीन प्रभाग चार व या भागातून जाणारे नागरिक जाणून आहे नागरिकांना सुविधा प्राप्त करून देण्यासाठी व या भागाचा अविकसित भागाचा विकास करण्यासाठी राज्य शासनाकडून आमदार सावरकर यांनी व या भागातील भाजपा नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास केला आहे विकासाची कामे सुरू आहे व राज्य शासनाकडून अजून निधी आणून या भागाचा विकास करण्याचा संकल्प आहे. जनतेचा विश्वास हे विकास कामाची हमी असून उड्डाणपुलाचे काम आमदार रणधीर सावरकर व रेल्वे प्रशासनाने सुरू केल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी तसेच या भागातील नागरिकांनी विविध संघटनेने अभिनंदन केले असून लवकरच 14 महिन्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असाही विश्वास व्यक्त केला आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या