पूरग्रस्त भागाचे महसूल विभागाने सर्वे करून सर्वांना न्याय द्यावा- आ.सावरकर
अकोला
अकोला शहरामध्ये अतिवृष्टीमुळे 18 जुलै ते 23 जुलै पर्यंत जुना शहर, नगर शिवसेना वसाहत हरिअर पेठ ,कोलखेड, उमरी कबीर नगर, खोलेश्वर लक्ष्मी नगर, पार्वती नगर राजेश्वर नगर सावंतवाडी या भागामध्ये नदी नाल्यांचे पाऊस पाणी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात घराचं नुकसान झाले आहे तसेच किराणा बाजार या भागातील दुकानदाराची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे महसूल विभागाने सर्वे करून सर्वांना न्याय द्यावा जात-पात पंत पेक्षा मानवता धर्माचे पालन करावा असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.
शहरात सर्वे करताना भेदभाव करत असल्याचा तक्रारी भाजपा नेते विजय अग्रवाल आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्याकडे आल्यावर तातडीने तहसीलदार सुनील पाटील मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांची संयुक्त बैठक घेऊन आमदार रणधीर सावरकर यांनी कोणावरी फेसबा होता कामा नये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सबका साथ सबका विकास सबका विश्वास प्रयासाने वाटचाल करीत असून सरकार बदनाम होणार नाही याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर असून सरकार नुकसान भरपाई देण्यासाठी सज्ज असताना भेदभाव का करण्यात येत आहे असा सवाल व दुजाभाव करण्यामागे काय उद्देश आहे असा सवाल आमदार सावरकर यांनी केला यावेळी विजय अग्रवाल यांनी जुना शहर या भागात अन्याय होता कामा नये तसेच शहरातील ज्या ज्या भागांमध्ये पाणी आले आहेत त्याचा महानगरपालिकेकडून अहवाल मागून त्या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा उमरी तीन, चार, पाच, तेरा 20, 19, 17, 9, 10, 8 ,12 या भागाचा सर्वे करण्यात यावा असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.
यावेळी विजय अग्रवाल यांनी तक्रार येता कामा नये. लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते यांचा यांना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी पाहणी करावी सर्वांना न्याय द्यावा असे सांगितले यावेळी मंडल अधिकारी अनिल माहोरे. तलाठी तसेच मनपा अधिकाऱ्यांसोबत सर्वे करावा अशीही यावेळी अगरवाल यांनी सांगितले तसेच ग्रामीण भागातील सर्वेस अहवाल आमदार सावरकर यांनी घेतला. पान टपरी ठेले तसेच न्यू नवीन किराणा बाजार या व्यापाऱ्यांचे सुद्धा सर्वे करण्यात यावी अशी यावेळी सांगण्यात आले यावेळी महानगर अध्यक्ष जयंत मसने , दिलीप मिश्रा अमोल गोगे, रवी दुतोंडे, हेमंत शर्मा अमोल गीते डॉक्टर संजय ढोरे उमेश गुजर गणेश पावसाळे योगिता पावसाळे एडवोकेट कुणाल शिंदे आनंद बलोदे वेंकट ढोरे, गणेश अंधारे , वाले मंगला सोनवणे संजय बडवणे, अनिल नाव कार, संदीप गावंडे, मिलिंद राऊत सागर शेगोकार हरीश काळे सुनीता अग्रवाल रश्मी अवचार प्रशांत अवचार सुभाष खंडारे सुमनताई गावंडे, अमोल मोहकार अभिजीत भगत राम खरात मंगेश सावरकर, रामदास टेकाळे, हेमंत शर्मा विजय चौधरी, सुनील बाठे, जयश्री दुबे लोकेश तिवारी, विजय पेंढारी पंढरी दोरकर गमे, सुनील कांबळे आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या