Ticker

6/recent/ticker-posts

जड वाहनास प्रवेश बंदी तरीही रस्त्यावरच जड वाहनांच्या रांगा

जड वाहनास प्रवेश बंदी तरीही रस्त्यावरच जड वाहनांच्या रांगा


अकोला प्रती - वाशिम बाय पास रोड वरून जुने शहरात जाण्यासाठी नविन रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे एका बाजुचा रस्ता सुरु आहे तर दुसऱ्या बाजूकडील रस्त्याचे काम अर्धवट झाले असून वाशिम बाय पास चौकात रस्ता सुरक्षा समिती ने फलक लावले असुन चांदखा प्लॉट मध्ये खुप मोठ्या प्रमाणात जड वाहनांची दोन्ही बाजुला रांगच रांग लागली आहे. यामुळे या रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे खुप मोठा अपघात होऊ शकतो.


 शहरात अपघाताचे सत्र सुरू असताना या मार्गावरील जड वाहतूक प्रवेश बंदी असताना सुद्धा कारवाई का होत नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.  जुने शहर पोलीस स्टेशन व वाहतुक शाखा निरिक्षक यांनी हे जड वाहने हटऊन नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. जड वाहतूक शहरात दाखल होणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी केली आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या