Ticker

6/recent/ticker-posts

अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख म्हणून माजी महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांची निवड 

अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख म्हणून माजी महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांची निवड 


अकोला
अभ्यासू मायक्रो नियोजन करणारे सातत्याने विजयश्री प्राप्त करून देणारे पक्षासाठी कार्य भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी महापौर भाजपा माजी महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या कर्तुत्वाचा व त्यांच्या संघटन कौशल्याचा लोकसंग्रहाचा फायदा घेण्याच्या दृष्टीने भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय अग्रवाल यांच्याकडे महत्वपूर्ण जबाबदारी अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख म्हणून निवड केली.


पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी कार्यकर्त्यांच्या मधात लोकप्रिय असणारे लोकसंग्रह असणारे माजी महापौर व भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय रासप रयत क्रांती जनसुराज्य पक्ष महायुतीचे आगामी लोकसभा मध्ये यशाचा शिखर वाढता राहावा या दृष्टीने विजय अग्रवाल यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी खासदार संजय भाऊ धोत्रे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर व आमदार गोवर्धन शर्मा संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्याशी विचार विनय करून जबाबदारी सोपवली आहे विजय अग्रवाल यांच्या निवडीचे पक्ष संघटने सोबत सर्वसामान्य नागरिकांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे शैक्षणिक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदान व सक्रिय सहभाग आगामी लोकसभे व महानगरपालिका निवडणुकीमध्ये उपयोगी पडणार आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील., महानगराध्यक्ष जयंत मसने, आमदार वसंत खंडेलवाल लोकसभा निवडणूक प्रमुख अनुप धोत्रे तेजराव थोरात, विजय मालोकार सिद्धार्थ शर्मा चंद्रशेखर पांडे गुरुजी, माजी आमदार बळीराम सिरस्कार, अर्चना मसने आदींनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या