मुसळधार पाऊस रेल्वे पटरी खाली पडला मोठा गड्डा, अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत
अकोला, माणा(मुर्तिजापूर) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाखालील माती व गिट्टी वाहून गेल्याने रेल्वे रुळाखाली 4 ते 5 फूट खोल खड्डा तयार झाला आहे. पाण्याच्या जास्त प्रवाहामुळे मातीची धूप होत असल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवार, 10 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मुसळधार पाऊस असल्यामुळे त ट्रॅक खालील भाग बुडाला. रेल्वे विभागाने दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली आहे. यामध्ये 6 ते 7 तास लागण्याची शक्यता रेल्वे सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर शहरमधील माणा परिसरात झालेल्या पावसामुळे रेल्वे स्थानकाजवळील हिरापूर गेटजवळ अप- डाऊन रेल्वे रुळाखालील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे माती व गिट्टी वाहून गेली. त्यामुळे रुळाखाली 4 ते 5 फूट खड्डा होऊन पाणी तुंबले.
ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना कळवले, त्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक रेल्वे प्रशासनाने तात्काळ बंद केली.सध्या रुळाखालील बंधाऱ्याचे काम सुरू झाले आहे, मात्र पाण्यामुळे त्यात अडथळे येत असून बांधकाम सुरू असून रेल्वे रुळाखाली गिट्टी व माती टाकून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहेत.
अकोला जिल्ह्यातील माणा रेल्वे स्थानकाजवळील हिरापूर गेटजवळ अंडरपासचे काम सुरू झाले आहे. रेल्वे रुळावर भराव टाकण्याचे काम सुरू झाल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक रेल्वे विभागाने तातडीने बंद केली आहे. ट्रॅकचे काम पूर्ण होण्यासाठी 6 ते 7 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आली आहे.
0 टिप्पण्या