नांदेड येथील गोवंश रक्षक शेखर रामुल रायपेलीवार यांच्या हत्येचा अकोल्यात निषेध
नांदेड मधील शिवनी भागात नेहमीच गोवंशाची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होत असते गौमाफिया गोंवश हत्याबंदीचा कायदा पायदळी तुडवत आहेत, त्यांच्यावर प्रतिबंध व्हावा यासाठी कारवाई व्हावी या उद्देशाने शेखर रामुल रायपेलीवार व अन्य सहा मित्र सदर प्रकाराची माहिती घेण्याकरिता गेले असता दबाव धरून बसलेल्या गौतस्करांनी घातक हत्यारे व अन्य धारदार व इतर शस्त्रांनी गोरक्षकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये शेखर रामुल रायपेलीवार याचा जागेवरच मृत्यू झाला असून अन्य सहकारी गंभीर जखमी आहेत.
सदर प्रकार निंदनीय असून नांदेडमधील ह्या गंभीर गुन्ह्याची विशेष पथक स्थापन करून " SIT " मार्फत चौकशी करण्यात यावी. हल्लेखोरांना त्वरित अटक करून त्यांच्यावर फास्टट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवण्यात यावा व त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. नांदेडमधील मृत्युमुखी पडलेल्या शेखर रामुल रायपेलीवार व भ्याड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गौरक्षकांच्या कुटुंबाला सरकारतर्फे तातडीने भरीव आर्थिक मदत देण्यात यावी व शहीद झालेल्या शेखर रामुल रायपेलीवार यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, तसेच जखमींचा उपचार खाजगी इस्पितळामध्ये प्रशासनातर्फे करण्यात यावा. संपुर्ण महाराष्ट्रात गौवंशहत्या बंदी कायदा लागू असताना देखील बेकायदेशीरपणे खूप मोठ्या प्रमाणात गौवंशाची कत्तल चालू आहे. स्थानिक पोलिस प्रशासन गौवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करतांना दिसून येत नाहीत, गौरक्षक रस्तावर उतरला तरच गौवंशाचे प्राण वाचतात असे दिसून येते त्या मुळे अश्या घटना वारंवार घडू नये म्हणुन गौवंश हत्या बंदी कायदा सेशन कमिटी करण्यात येऊन 10 वर्ष शिक्षेची तरतूद करावी व जप्ती केलेले वाहन सोडण्यात येऊ नये.
आदी मागण्यांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा विश्व हिंदू परिषद तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी विश्व हिन्दू परिषद चे विभाग मंत्री संजय रोहनकार , विभाग संयोजक अभिलाष खडके बजरंग दल , किशोर बोथरा , सुनील आसोलकर , विजय चिंचोलकार , यांच्या मार्गदर्शनात हे निवेदन देण्यात आले. या वेळी शिवा कळसकर , रामेश्वर तराळे, अमित रामलोया, किशोर फाळके ,सनी कराळे, रोहित भटकर ,प्रणव बाळापुरे ,नितीन ठाकूर ,गौरव इंगळे , ,शुभम कराडे , विशाल रत्नपारखी, विनय मानकर, धीरज गोसावी ,किशोर सोनवणे ,तुषार भटकर , शिवा सोनटक्के, ओम माहुरुत यांच्या सह आदींनी निवेदन दिले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या