खा. असुद्दीन ओवैसी यांचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत, पण....
अकोल्यात असुद्दीन ओवैसी यांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले. अकोल्यात ओवैसीनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलंय. काल बुलढाणा मध्ये ओवैसी यांची सभा झाली त्या सभेवर ओवैसी नी बोलण्याचे टाळले आणि लगेच अकोल्यातून निघून गेले.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
एमआयएमचे खासदार सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. काल बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे त्यांची सभा संपन्न झालीय. ज्यामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवलीय. आज मलकापूरच्या सभेनंतर ते अकोलामार्गे अमरावतीच्या सभेला संबोधित करणार होते, या वेळी अकोल्याच्या अकोट फैल येथे पोहोचल्यावर एमआयएम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केलय. काही वेळाने ते अकोट फैल येथुन अमरावतीकडे रवाना झालेय. यादरम्यान पत्रकारांनी त्यांच्यासोबत भेटीची वेळ मागितली असता त्यांनी बोलण्याचे टाळून सरळ निघून गेले. अकोट फैल, आपतापा चौक परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्तांचा जमाव झाला होताय. कार्यकर्त्यांच्या असभ्य वर्तनामुळेच त्यांनी अकोला थांबण्याचे टाळून निघून गेल्याची चर्चा सुरू होती.
0 टिप्पण्या