Ticker

6/recent/ticker-posts

अकोल्यातील युवतीची मुंबईत हत्या; प्रकरणी अकोल्यात सर्वपक्षीय कॅन्डल मार्च

अकोल्यातील युवतीची मुंबईत हत्या; प्रकरणी अकोल्यात सर्वपक्षीय कॅन्डल मार्च


 
अकोला: मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील गर्ल्स हॉस्टेलमध्ये गेल्या मंगळवारी सायंकाळी एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. हॉस्टेल मधील चवथ्या माळ्यावरील एका खोलीचा दरवाजा तोडून पोलीस आत गेले असता तरुणीवर अतिप्रसंग करुन त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असावी,असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मृतक युवती ही अकोला शहरातील रहिवासी आहे. या घटनेची अकोल्यात माहिती होताच शहरात शोककळा पसरली होती . मृत तरुणी ही मुंबईतील वांद्रे येथील एका महाविद्यालयात पोलिटेक्निकलचे शिक्षण घेत होती. वसतिगृहातील एक सुरक्षा रक्षक हा नेहमी तिला त्रास द्यायचा, याबाबत तिने आपल्या वडिलांना सांगितले होते. येत्या दोन- तीन दिवसांमध्ये ती अकोल्यात येणार होती. त्यासाठी तिने रेल्वेचे तिकीटही काढले होते. त्या मृत युवतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासठी आज संध्याकळी आकोल्यात गांधी जवाहर बाग ते अशोक वाटिका पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला 
   सविस्तर वृत्त पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा


मृतक तरुणी ही विदर्भातील अकोला शहरातील रहिवासी आहे. मुंबईत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. विद्यार्थीनीची हत्या केल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने या तरुणाने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. आपल्या मुलीच्या हत्येस वसतीगृह प्रशासन जबाबदार असून, न्याय मिळेपर्यंत लढा देणार असल्याचे मृतक पीडिता युवतीच्या पालकांनी सांगितले. वसतीगृहाच्या दोन वॉर्डन यांना सह आरोपी करा, अशी मागणी पालकांनी केली आहे. जोपर्यन्त वॉर्डन यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका मुलीच्या पालकांनी घेतली होती. मात्र काहींच्या मध्यस्थिने अंतिम विधी मुंबईत आटोपला त्या मृत युवतीला आज संध्याकळी अकोल्यात सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यासठी गांधी जवाहर बाग ते अशोक वाटिका पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या