Ticker

6/recent/ticker-posts

पश्‍चिम विदर्भासाठी हरभरा खरेदीचे ५ लाख क्विंटलचे वाढीव उद्धीष्ट आमदार सावरकर यांच्या प्रयत्नाला यश

पश्‍चिम विदर्भासाठी हरभरा खरेदीचे ५ लाख क्विंटलचे वाढीव उद्धीष्ट आमदार सावरकर यांच्या प्रयत्नाला यश


अकोला, या हंगामात शासनाच्या आधारभूत ५३३५ रुपये किमतीने हरभरा खरेदी सुरू आहे. बाजारपेठेत हरभऱ्याला दर कमी असल्याने शासकीय खरेदीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत दोन वेळा उद्दिष्ट वाढवून द्यावे लागले. आता आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नाने पाच लाख क्विंटल हरभरा खरेदी करण्याचे उद्दिष्ट वाढवण्यात आले असून अकोला जिल्ह्यात एक लाख क्विंटल हरभरा शेतकऱ्यांचा खरेदी करण्यात येणार आहे. याबाबत शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जाणून राज्य शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केल्याबद्दल गतिशील सरकार व भाजपा शिवसेना सरकारचे नेते नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तमाम पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या वतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.
आता पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत हरभरा खरेदीचे सुमारे पाच लाख क्विंटलने उद्दिष्ट वाढवले असून, लवकरच याबाबत अधिकृत पत्र निघणार असल्याची माहितीप्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर दिली.


 हरभऱ्याचे ८७ कोटी‌ ५७ लाखांवर चुकारे अदा
शासकीय हरभरा खरेदी नाफेडमार्फत आठ ते नऊ एजन्सीजद्वारे केली जात आहे. जिल्ह्याजिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ मार्केटिंग फेडरेशन, शेतकरी कंपन्यांद्वारे प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. राज्यात आतापर्यंत खरेदीचा आकडा ६५ लाख क्विंटलपेक्षा अधिक झालेला आहे. यंदा खरेदीसाठी उत्पादकतेच्या २५ टक्के खरेदीचा निकष लावल्याने अडचण झाली होती. त्यानुसार पहिल्यांदा मिळालेले उद्दिष्ट केव्हाच पूर्ण झाले. त्यानंतर बरेच दिवस खरेदी बंदही राहिली. यासंदर्भात सातत्याने आमदार सावरकर यांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला व त्यांना यश मिळून राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ मिळाले.



एकदा उद्दिष्ट वाढवून दिल्यावरही नोंदणीकृत शेतकरी पूर्ण होणे शक्य नसल्याने आता दुसऱ्यांदा खरेदीचा लक्ष्यांक वाढवून दिला जात आहे. आमदार सावरकर यांच्या प्रयत्नाने दुसऱ्यांदा विदर्भाच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे व शेतकऱ्याला आधार देण्याचं काम भाजपा शिवसेना सरकार नामदार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व करून गतिशील शासन असल्याचे कृती देखील सिद्ध करत आहे . महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तांत्रिक अडचण दूर झाल्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळेल असाही विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला.


, अकोला जिल्ह्याला एक लाख क्विंटल, तर बुलडाणा, अमरावती प्रत्येकी दीड लाख, यवतमाळ ७० हजार आणि वाशीम जिल्ह्याला ३० हजार क्विंटलचा लक्ष्यांक वाढवून मिळाला आहे. त्यानुसार खरेदीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. यंदाच्या हंगामात ११ जूनपर्यंत नाफेडची ही खरेदी होणार आहे. अशी माहिती सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनंदन व आभार पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार सावरकर यांनी व्यक्त केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या