Ticker

6/recent/ticker-posts

आज बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल

आज बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल


इयत्ता बारावीची परीक्षा : फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. परीक्षेला जिल्ह्यात ८६ केंद्रांवर २४ हजार ५५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल २५ मे रोजी दुपारी दोन वाजता लागणार आहे. या निकालात जिल्ह्यातील कोणते कनिष्ठ महाविद्यालय बाजी मारते. याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. पथकांची विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यात आली होती. बारावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर तीन शासकीय कर्मचाऱ्यांचे बैठे पथक तैनात होते. बारावी येईल. परीक्षेदरम्यान कॉपीचा प्रकार घडू नये यासाठी बोर्डाने ११ परीक्षकांची नियुक्ती केली होती. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर कॉपी प्रकाराला आळा बसला होता. त्यामुळे जिल्ह्याचा निकाल कसा लागतो. याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


या संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर गुरुवार २५ मे २०२३ रोजी दुपारी २:०० वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येत आहे. विद्यार्थी व पालकांना 

mahresult.nic.in.mahresult.nic.in.

https://hsc.mahresults.org. inhttps://hsc.mahresults.org. in. http://hscresult.mkcl.orghttp://hscresult.mkcl.org


या 👆 संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या